Sharad Pawar: 'निकालानंतर एखादा घरी बसला असता, पण मी काही...', शरद पवारांचं मोठं विधान

रोहित गोळे

Maharashtra assembly election 2024 results: विधानसभा निवडणूक निकालानंतर आज (23 नोव्हेंबर) शरद पवार यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन एक मोठं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाहा शरद पवार निवडणूक निकालाबाबत काय म्हणाले

point

पुन्हा एकदा जनतेत जाणार, शरद पवारांचं विधान

point

अजित पवारांच्या विजयावर काय म्हणाले पवार?

Sharad Pawar on maharashtra assembly election 2024 results: कराड: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड असं बहुमत दिलं. तर दुसरीकडे महविकास आघाडीची मात्र अक्षरश: धूळधाण झाली. तीन पक्षांना मिळून 50 चा आकडा देखील यावेळी गाठता आला नाही. दरम्यान, या निकालानंतर आज (24 नोव्हेंबर) शरद पवार यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. (see sharad pawar big statement on maharashtra assembly election 2024 results what exactly he said)

'निकाल काय लागला काल... आणि मी आज कराडमध्ये आहे. या निकालानंतर सुद्धा एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसणार नाही...', असं म्हणत शरद पवार यांनी पुन्हा एकदा लोकांमध्ये जाऊ असं म्हणत कंबर कसली आहे. 

पाहा निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया 

'असा अनुभव आम्हाला कधी आलेला नव्हता'

'आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निकाल नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय नाही. त्यामुळे माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. तोपर्यंत आताची जी व्यवस्था आहे त्यावर भाष्य करू इच्छित नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष आम्ही सामाजिक जीवनात आहोत. पण असा अनुभव आम्हाला कधी आलेला नव्हता.'

हे वाचलं का?

    follow whatsapp