Sion Koliwada Vidhan Sabha Election 2024: सायन-कोळीवाडा पुन्हा भाजपचा?, मविआ करणार बालेकिल्ला सर?

रोहित गोळे

Sion Koliwada Vidhan Sabha Election 2024 R Tamil Selvan: लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार राहुल शेवाळेंना केवळ दोनच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळालं. ज्यामध्ये सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sion Koliwada Constituency: मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांना मुंबईत फारसं यश मिळालं नाही. मुंबई दक्षिण-मध्य ही हक्काची समजली जाणारी जागा शिंदे गटाने गमावील. पण याचवेळी लोकसभा मतदारसंघातील सायन-कोळीवाडा या विधानसभा मतदारसंघात भाजपने त्यांची कामगिरी चोख बजावल्याचं पाहायला मिळतंय.  लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने महायुतीच उमेदवार राहुल शेवाळे यांना  मताधिक्य दिलेलं. (sion koliwada vidhan sabha election 2024 analysis of result and impact bjp mahayuti mla r tamil selvan)

सायन-कोळीवाडा विधानसभा हा मतदारसंघा मागील काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला समजला जात आहे. इथले भाजपचे आमदार आर. तमिळ सेल्वन यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यामुळे भाजपचा हा गड आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ सर करू शकतं की नाही याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत.

हे ही वाचा>> Vidhan Sabha Election 2024: धारावीचा पेपर सोपा, पण विधानसभेला उमेदवार कोण

मुंबई दक्षिण मध्य मतदारासंघातील शिवसेना (UBT)चे  उमेदवार अनिल देसाई  सावंत यांनी 53 हजार 384 मतांनी विजय मिळवला. तर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांना 3,41,754 मतं मिळाली होती. या निकालामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत झाली. शिवसेनेने (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल शेवाळेंना तिकीट दिलं होतं. तर शिवसेना (UBT)ने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाईंना उमेदवारी दिली होती. पण या मतदारसंघात अनिल देसाई यांनी मोठा विजय मिळवत राहुल शेवाळे यांना पराभूत केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp