Uddhav Thackeray Interview: "...म्हणून मी भाजपसोबत जाणार नाही"; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

साहिल जोशी

Uddhav Thackeray On BJP:  विधानसभा निवडणुकीचं मतदान 20  नोव्हेंबरला एकाच टप्प्यात पार पडणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. तत्पूर्वी, सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray latest News
Uddhav Thackeray On BJP
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

point

उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना सुनावलं

point

मुलाखतीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray On BJP:  विधानसभा निवडणुकीचं मतदान 20  नोव्हेंबरला एकाच टप्प्यात पार पडणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. तत्पूर्वी, सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत मोठं विधान केलं आहे. "भाजपने सर्वात आधी 2014 ला माझी साथ सोडली होती. त्यावेळीही मी  हिंदूच होतो. पण मोदीजी मला नकली संतान म्हणतात. मी युती तोडली नाही. युती त्यांनी तोडली होती. मी त्यांना फसवलं नाही, 2019 ला त्यांनी मला फसवलं", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ते (भाजप) कुठेही जाऊ शकतात. मी कुठेच जाऊ शकत नाही. त्यांनी मला फसवलं आहे. म्हणून मी त्यांची साथ सोडली. भाजपला फक्त सत्ता हवी असते. कुणालाही ते सोडू शकतात. हा भाजपचा सत्ता जिहाद आहे. खुर्ची जिहाद आहे. खूप लोक खूप साऱ्या गोष्टी सांगत असतात. पण मी भाजपसोबत का जाऊ? त्यांनी माझी शिवसेना फोडली. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत. मला नकली संतानही बोलले. मग मोदीजी नकली संतानसोबत हातमिळवणी करतील का? हा माझ्या आई-वडिलांचा अपमान आहे. मोदींनी हा अपमान केला आहे.

हे ही वाचा >>  Uddhav Thackeray Exclusive : मुख्यमंत्रिपदाचा विषय काढताच ठाकरेंनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडंचं नाव का घेतलं?

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंचं नाव न घेता म्हणाले, ते आजपर्यंत जे काही आहेत, ते माझ्या वडिलांमुळेच. आमच्या घरातून त्यांना जे काही घ्यायचं होतं, ते त्यांनी घेतलं. माझ्या वडिलांनी त्यांना खूप काही दिलं. ते परिवारवादावर बोलतात, पण हे कुटुंब तर आम्हीच मोठे केले आहेत. त्या कुटुंबातून बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री बनला तर त्यात गैर काय आहे. तो मुख्यमंत्री बनू शकत नाही का? माझ्या वडिलांचं नाव चोरलं. तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव घ्या. माझ्या वडिलांनी सर्वकाही दिलंय. त्यांना लाज वाटत नाही. माझ्या वडिलांचं नाव सांगून ते मत मागत आहेत.

हे ही वाचा >> Election Commission : उद्धव ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाचं पत्र

राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात माहिम मतदारसंघात उमेदवार उभा करण्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांची राजकीय भूमिका काय आहे? मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार, असं ते म्हणतात. जे लोक महाराष्ट्राला लुटत आहेत, त्यांनाच ते मुख्यमंत्री बनवत आहेत. असं असेल तर सॉरी...माफ करा..मी महाराष्ट्राच्या लुटारूंना साथ देणार नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp