Uddhav Thackeray : लुटेंगे और बाटेंगे... हाच भाजपचा खरा नारा, ठाकरेंचा संभाजीनगरमधून हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली तिसरी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मोदी-शाहांवर ठाकरेंचा पलटवार
'बटेंगे तो कटेंगे' नाऱ्याला प्रत्युत्तर
वैजापूरच्या सभेत भाजपवर निशाणा
Uddhav Thackeray Vaijapur : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. जसजसा प्रचाराचा दिवस जवळ येतोय तशी नेत्यांच्या भाषणांची धार वाढ चालली आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांचा वादळी दौरा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. अशातच आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याला उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर मोठी टीका झाली. महाविकास आघाडीच्या त्यांच्या या नाऱ्यावर टीका केलीच, पण भाजपच्या नेत्यांनीही या घोषणेचा विरोध केला होता. त्यातच आज उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणांना विरोध करत तुफान हल्लाबोल केला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Devendra Fadnavis : "अजित पवारांना हे कळायला वेळ लागेल...", 'बटेंगे कटेंगे'चं समर्थन, फडणवीस थेट बोलले
"अमितबाबू काश्मीर में मुफ्ती मोहम्मद के साथ बैठे थे तब कहा था आपका हिंदुत्व?" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट अमित शाहांवर हल्लाबोल केला. मी बाळासाहेब ठाकरेंचा सुपूत्र आहे, माझा रिमोट तुमच्या हातात राहिला नाही, तर दुसऱ्या कुणाच्या हातात मी तो कसा जाऊ देईल? असं म्हणत मोदी-शाहांना प्रत्युत्तर दिलं. तुम्ही न बोलवता नवाझ शरीफच्या घरी केक खायला का गेला होतात? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यांनी यावेळी केला.
राज्यातला शेतकरी आज त्रस्त आहे, कापसाला, सोयाबीनला भाव नाही, महागाई वाढली आणि त्यांना तुम्ही सांगताय की बटेंगे तो कटेंगे? भाजपचा खरा नारा बटेंगे तो कटेंगा नाहीये भाजपचा खरा नारा लुटेंगे हा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी आज आपली तिसरी सभा घेतली. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे, कारण या जिल्ह्यात ठाकरेंच्या पाच आमदारांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता इथे आपल्या नवा उमेदवारांना निवडून आणण्याचं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT