Amit Thackeray : पुतण्या अमित ठाकरेला उद्धव ठाकरे छुपी मदत करणार? 'या' कारणामुळे होतेय चर्चा
Maharashtra Assembly Election 2024: गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे दादर-माहिम विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. त्यातच आता Uddhav Thackeray यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरे पुतण्याचा छुपी मदत करणार?
दादर माहिम मतदारसंघाचं राजकारण पुन्हा चर्चेत
दादर-माहिममध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार का?
Dadar Mahim VidhanSabha 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांदरम्यान चर्चेत असलेला एक मतदारसंघ म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकरही याच मतदारसंघात मैदानात आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महेश सावंत या मतदारसंघातून लढणार आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून, पुढच्या काही दिवसांत मोठ्या ताकदीनं तिन्ही उमेदवारांसाठी प्रचार होताना दिसणार आहे. मात्र आता उद्धव ठाकरे या मतदारसंघात सभा घेणार नसल्याचं समजतंय. याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जातायत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Sadabhau Khot : टीका करताना बरळलेल्या सदाभाऊंची दिलगिरी, म्हणाले ही गावाड्याची भाषा, ही भाषा समजण्यासाठी तुम्हाला...
दादर-माहिम मतदारसंघात खुद्द राज ठाकरे यांचे पुत्र मैदानात उतरल्याचं समजल्यानंतर महायुती इथे उमेदवार देणार नाही असं वाटलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली. नंतरच्या काळातही सदा सरवणकर हे माघार घेतील की नाही याबद्दल वेगवेगळे कयास लावले गेले. अखेर शिंदेंनी सरवणकरांना बळ देत उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे हा मतदारसंघ सध्या हॉटस्पॉट आहेच, मात्र आता आणखी एका मुद्द्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे ठाकरे बंधूंमधील वाद राज्याला परिचित आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात यापूर्वी मनसेने वरळीत उमेदवार दिला नव्हता, हे सुद्धा सर्वज्ञात आहे. कदाचित यामुळे उद्धव ठाकरे या मतदारसंघात ताकद लावणार नसल्याचं बोललं जातंय. कारण उद्धव ठाकरे हे पुढचे काही दिवस प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत, मात्र या मतदारसंघात त्यांची सभा नसणार आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Govindgiri Maharaj : "पप्पू नावाचं एक घुबड देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंडून...", गोविंदगिरी महाराजांची राहुल गांधींवर टीका?
उद्धव ठाकर पुढच्या काही दिवसात राज्यभरात प्रचाराच्या 36 सभा घेणार आहेत. त्यामध्ये राज्यातले अनेक महत्वाचे मतदारसंघ आहेत. मात्र अमित ठाकरे यांच्याविरोधात असलेल्या महेश सावंत यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार नाहीत. त्यामुळे पुतण्याला ते मदत करणार की काय? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. उद्धव ठाकरे आपल्या पुतण्याला छुपी मदत करणार की काय याचं उत्तर आता पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT