स्मृती इराणींविरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Police Cases filed against 50 NCP workers protesting against Union Minister Smriti Irani

स्मृती इराणींविरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात करण्यात आली होती घोषणाबाजी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी विरोधात पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मृती इराणी पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट मध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय घडली घटना?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते अमित शाह (Amit Shah) यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलं. पुण्यातल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप असा मोठा राडा झाला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काहीवेळ थांबवावा लागला होता.

या घटनेनंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. असं असलं तरीही भाजपच्या महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.

Police Cases filed against 50 NCP workers protesting against Union Minister Smriti Irani
पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा! भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीने केला मारहाणीचा आरोप

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी पुणे दौऱ्यावर होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचं प्रकाशन स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात सोमवारी सकाळपासूनच इराणी यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्यांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. स्मृती इराणी ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या तिथेही त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

स्मृती इराणी या जेव्हा विरोधात होत्या तेव्हा त्यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढल्याने दिल्लीत आंदोलन केलं होतं. २०१२ मध्ये झालेलं हे आंदोलन चांगलंच चर्चेत राहिलं. आज पुण्यात जेव्हा स्मृती इराणी आल्या तेव्हा त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आंदोलन केलं. कारण आत्ताही इंधनाचे जर म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरचे दर वाढले आहेत. मात्र त्याबाबत स्मृती इराणी काहीही का बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला आता याच प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in