संदीप मोहोळच्या हत्येचा पॅटर्न काय होता? कसं जन्माला आलं पुण्यातलं गँगवॉर?
मुळशी पॅटर्न हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चर्चेत होता. य़ा सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळया, अर्थकारण त्याच्याशी संबंधित असलेले राजकारण या सगळया घटकांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले होते. मुळशी पॅटर्न हा सिनेमा नव्हता तर ते जळजळीत वास्तव होतं एक स्टेटमेंट होतं. पण मुळशी पॅटर्न या सिनेमाचा जो नायक होता किंवा काही जणांसाठी जो खलनायक होता राहुल पाटील […]
ADVERTISEMENT

मुळशी पॅटर्न हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चर्चेत होता. य़ा सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळया, अर्थकारण त्याच्याशी संबंधित असलेले राजकारण या सगळया घटकांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले होते. मुळशी पॅटर्न हा सिनेमा नव्हता तर ते जळजळीत वास्तव होतं एक स्टेटमेंट होतं. पण मुळशी पॅटर्न या सिनेमाचा जो नायक होता किंवा काही जणांसाठी जो खलनायक होता राहुल पाटील उर्फ राहुल्या यांची भूमिका ज्या व्यक्तीवर बेतली होती त्याचीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
90 च्या दशकात पुणे शहर आणि आसपासचे तालुके हे कात टाकत होते. पुणे म्हणजे पेन्शनरचे शहर, पुणे म्हणजे सायकलींचे शहर ही ओळख जाऊन या शहराची नवी ओळख बनत होती. पुणे हे नवे आयटी हब बनत होते. आंतरराष्ट्रीय कंपन्या शहरात येत होत्या अर्थातच यासाठी मोठ्या प्रमाणात जमीनींचे व्यवहार होऊ लागले होते.
जमिनी या सोन्यापेक्षा महाग झाल्या होत्या. पुणे शहर जसं वाढत गेलं तसंतसे पुण्याच्या पंचक्रोशीत ज्यांच्या जमिनी होत्या ते अल्पावधीत कोट्याधीश झाले. पैसा आला तशी सत्ता आली, राजकारण आले, हितसंबंध आले, हितसंबंध जपण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आणि याच स्पर्धेतून जन्म झाला तो पुण्यातल्या गँगवॉरचा, भाई लोकांचा आणि मुळशी पॅटर्नचा…..