Ashok Saraf at Mumbaitak Baithak 2024 : ''मला एक वाईट सवय आहे...'', अशोक सराफांनी काय सांगितलं?
Ashok Saraf at Mumbaitak Baithak 2024 : मुंबई तकच्या बैठकीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांची वाईट सवय सांगितली आहे.त्याचसोबत अभिनेते सचिन पिळगावकरांसोबत त्यांची कशी ट्यूनिंग आहे आणि नवरा माझा नवसाचा 2 सेटवरील किस्से स्टारकास्टने या बैठकीत सांगितले आहे. नेमके हे किस्से काय आहेत? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सचिन पिळगावकरसोबत ट्यूनिंग आहे
नवरा माझा नवसाचा 2 सेटवरील किस्से
मला एक वाईट सवय आहे
Ashok Saraf at Mumbaitak Baithak 2024 : मुंबई तकच्या बैठकीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांची वाईट सवय सांगितली आहे.त्याचसोबत अभिनेते सचिन पिळगावकरांसोबत (Sachin Pilgaonkar) त्यांची कशी ट्यूनिंग आहे आणि नवरा माझा नवसाचा 2 सेटवरील किस्से स्टारकास्टने या बैठकीत सांगितले आहे. नेमके हे किस्से काय आहेत? हे जाणून घेऊयात. (ashok saraf at mumbaitak baithak ashok saraf tells there bad habits sachin pilagaonkar supriya pilgaonkar swapnil joshi navara majha navsacha 2)
मुंबई तकच्या बैठकीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत अशोक सराफ म्हणाले की, ''मला एक वाईट सवय आहे. पिच दिसलं की हाणायचं. त्यात माझ्या हाणण्याची स्टाईल आणि स्ट्रोक आहे, तो ज्याला कळतो तो माझा.सचिनच्या बाबतीत असं होतं माझं, त्याला माहिती आहे? मी काय बोलणार आहे ,मी काय करणार आहे. मला माहितीय त्याला काय पाहिजे आहे. हे पहिल्या सिनेमापासून सुरु आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांकडे बघून हावभाव देतो. आमचं काही जास्त बोलण होतं नाही काही नाही. आधीच चित्र तयार असतं काय सीन करायचाय. हा शॉट आधीच ठरलेला असतो. आमची मन जुळतात'', असे अशोक सराफ यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Pankaja Munde Mumbaitak Baithak 2024 : प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन होणार का? पंकजा मुंडेंचं मोठं विधान
हे ही वाचा : Mumbaitak Baithak 2024 live Updates: 'बारामती शाबूत राहिली तर आयुष्यभर..', मुंबई Tak बैठकीत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
आम्हाला आमची ट्युनिंग सांगायची गरज पडली नाही. ती प्रेक्षकांना नेहमी आढळली. एकमेकांचं ट्युनिंग आणि एकमेकांची कॉम्प्लिमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. डायरेक्टर म्हणून मी त्याला कॉम्प्लिमेंट करतो, अॅक्टर म्हणून तो मला कॉम्प्लिमेंट करतो. त्यामुळे ते रसायन दुर्मिळ आहे, असे अभिनेता सचिन पिळगावकर यांनी सांगितले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तसेच सचिन पिळगावकर यांनी यावेळी नवरा माझा नवसाचा 2 सिनेमात नेमकं प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे, याची माहिती देखील दिली आहे. या सिनेमात दोन जोडप्यांची गोष्ट असणार आहे. पहिल्या भागात लव्हस्टोरी नव्हती मात्र दुसऱ्या भागात प्रेक्षकांना लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत पहिला भाग हा एसटी बसमध्ये शुट झाला होता, आता दुसरा भाग कोकण रेल्वेत शुट झाला आहे. त्यामुळे कोकणात जातानाची प्रवासाची गम्मत आणि कोकण दर्शन प्रेक्षकांना या सिनेमात पाहता येणार आहे.
ADVERTISEMENT