Eknath Shinde Mumbaitak Baithak 2024 : 'माझी लाडकी बहीण योजना' कल्पना कुणाची? CM शिंदेंनी दिलं उत्तर
Eknath Shinde on Vidhan Sabha election 2024 in Mumbaitak Baithak 2024: विधानसभा निवडणुकीची तयारी, महायुतीचे जागावाटप यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाष्य...
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खास मुलाखत
मुंबई Tak बैठकमध्ये मांडली सडेतोड भूमिका
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना टोला
Eknath Shinde News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यानिमित्ताने आयोजित 'मुंबई Tak बैठक'मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राजकारण, विधानसभा निवडणूक आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केले. (Chief Minister Eknath Shinde Exclusive Interview with Mumbai Tak)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली. त्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपासून जे निर्णय घेतले, ते राज्याच्या हिताचे आहेत. माझी लाडकी योजनेआधीही आम्ही अनेक निर्णय घेतले."
आम्ही स्पीड ब्रेकर काढले -मुख्यमंत्री शिंदे
मुंबई Tak बैठकमध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आमच्या सरकारने १२३ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली. शेतकरी हा अन्नदाता आहे. आम्ही नियमावली बाजूला ठेवल्या. हे राज्य पहिलं राज्य आहे की, शेतकरी सन्मान योजना राबवत आहे. एक रुपयात विमा देणारे हे पहिले सरकार आहे."
हे वाचलं का?
हेही वाचा >> "...तर प्रकाश आंबेडकर आणि वंचितचे 4 जण खासदार झाले असते"
"आम्ही नियमावर बोट ठेवत नाही, तर आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. जे प्रकल्प आधीच्या सरकारने थांबवले होते, ते सुरू केले. आम्ही स्पीड ब्रेकर काढून टाकले. समृद्धी महामार्ग, अटल सेतू सुरू केला", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "५ लाख कोटींचे करार केले"
"देशात आपले राज्य पायाभूत सुविधांमध्ये पहिले आहे. विरोधक म्हणतात की, हा कारखाना गेला. तो कारखाना गेला. पण, दावोसमध्ये आम्ही ५ लाख कोटींचे करार केले. ८० हजार कोटींचा करार सरकार काल-परवा केला. गडचिरोलीमध्येही उद्योग जात आहेत."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> भारतात खळबळ! "सेबी अध्यक्षांच्या परदेशात बनावट कंपन्या; अदाणी समूहाशी संबंध"
"विकासाला प्राधान्य देताना कल्याणकारी योजना राबवत आहोत. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे. महिला भगिनींसाठी लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना सुरू केल्या. त्या सामान्य कुटुंबाला आधार देणार आहेत."
ADVERTISEMENT
माझी लाडकी बहीण योजनेची कल्पना कुणाची?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही महायुती म्हणून काम करतोय. कल्पना कुणाच्याही डोक्यात आली, तरी एकत्र निर्णय घेतो.सात-आठ महिन्यापूर्वी ही कल्पना आली. आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला. जनतेच्या हितासाठी आम्ही टीम म्हणून काम करतोय. श्रेय घेण्याचं काय? सरकार म्हणून ती जबाबदारी आहे आमची."
हेही वाचा >> "मी आणि ऐश्वर्या घटस्फोट घेत आहोत", अभिषेकच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ
"कोट्यवधी रुपयात खेळणार लोकांना १५०० रुपये कमी वाटतात. पण, आम्ही देत आहोत तर तुम्ही खोडा का घालत आहात. कुणीतरी कोर्टात गेले. म्हणजे तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. माझ्या बहिणी सर्वसामान्य आहेत. त्यांना सगळ्या खर्चाचा ताळमेळ बसावा लागतो. आम्ही त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. माझी सख्खी बहीण एक आहेत. आता लाखो करोडो बहिणी आहेत. मा त्या बहिणींना सांगतोय की या सावत्र भावांपासून सावध रहा", असे म्हणत शिंदे विरोधकांवर हल्ला चढवला.
"आम्ही निवडणुका डोळ्यासमोर काम केलेले नाही. आम्ही पूर्वीपासून काम करत आहोत. काही जण घोषणा करतात, नंतर सांगतात की प्रिंटिंगमध्ये चूक झाली. आमचे तसे नाही", असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना लक्ष्य केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT