MumbaiTak Baithak 2024: "...तर प्रकाश आंबेडकर आणि वंचितचे 4 जण खासदार झाले असते"

मुंबई तक

ADVERTISEMENT

वर्षा गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
वर्षा गायकवाड आणि प्रकाश आंबेडकर.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वर्षा गायकवाड यांचे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर भाष्य

point

मविआ वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार?

point

प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिल्याने गायकवाड नाराज?

Varsha Gaikwad on Vanchit Bahujan Aghadi : मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीला घेतलेल्या एका निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीसोबत न आल्याने वंचित बहुजन आघाडीचे कसे नुकसान झाले, याबद्दल त्यांनी भाष्य केले. (Varsha Gaikwad Offers to vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar for alliance)

प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव काढली आहे. महाराष्ट्रात तिसरी आघाडी होऊ शकते, तसा प्रयत्न सुरू आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या व्होट बँकेत वाटेकरी निर्माण होईल. मविआ याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागेल, असे वाटतेय का?, असा प्रश्न वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला.

हेही वाचा >> मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं? वर्षा गायकवाडांनी मांडली काँग्रेसची भूमिका 

प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी उत्तर देताना सांगितले की, "प्रकाश आंबेडकरांबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात वेगळी भावना आहे. पण, एक गोष्ट मी इथे स्पष्ट करू इच्छिते की, २०१९ मध्ये त्यांना मतदान झाले. पण, यावेळी समाजाने विचार केला की, लोकशाही  आणि संविधान वाचवायचे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लोकांनी भाजपविरोधात मतदान केले -गायकवाड

"संविधान, लोकशाहीविरोधात असलेल्या भाजपला हटवायचं. संविधानविरोधातील विधानामुळे लोकांनी भाजपविरोधात मतदान केले. प्रकाश आंबेडकर ज्या ज्या वेळी मला भेटले, त्यावेळी मी त्यांच्यासमोर भूमिका मांडली की, आपली लढाई संविधानासाठी लढायची आहे", असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. 

आंबेडकरांच्या त्या निर्णयामुळे वर्षा गायकवाड नाराज?

"माझे एकच सांगणे आहे की, भलेही माझ्याकडे आंबेडकर नाव नसेल, पण वर्षा गायकवाड बाबासाहेबांची अनुयायी आहे. वर्षा गायकवाड बाबासाहेबांच्या विचारांवर काम करणारी आहे. त्यांनी काँग्रेसला चार ठिकाणी पाठिंबा दिला, त्यावेळी त्यांनी पाचवा पाठिंबा मला द्यायला हवा होता", अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजित पवार-शरद पवार एकत्र येणार? प्रफुल पटेल म्हणाले... 

"आमची तर इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकर खासदार व्हावेत. ते आमच्याबरोबर आले असते, तर ते खासदार झाले असते. त्यांच्याबरोबर त्यांचे आणखी चार जण खासदार झाले असते", असे विधान वर्षा गायकवाड यांनी केले. 

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना विधानसभेला सोबत घेणार?

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "आम्ही त्यांना पूर्वी पण बोललो आहोत. आमचं आता पण त्यांना म्हणणं आहे. शेवटी तिसरी आघाडी करण्यामागचे कारण काय? तिसरी आघाडी करून तिचे होणार काय आहे?", असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT