Mumbai Local Train Update : मध्य रेल्वे, हार्बर लाईनवरील लोकल सेवा सुरु झाली का? मोठी अपडेट

मुंबई तक

Mumbai Rains Live : मागील काही तासांत मुंबई आणि एमएमआरडीए भागात झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई लोकल सेवा ठप्प झाली असून, ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचा...

ADVERTISEMENT

मुंबईतील लोकल सेवा पावसामुळे विस्कळीत झाली आहे.
मुंबईतील लोकल सेवेबद्दलचे ताजे अपडेट्स वाचा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी

point

मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत

point

मध्य आणि हार्बर लाईनवरून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल बंद

Mumbai Rains Updates, Mumbai Local Train live News : पहिल्याच पावसाने मुंबईतील लोकल सेवेला ब्रेक लावला आहे. अनेक ठिकाणी रुळावर पाणी आल्याने मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवेवर परिणाम झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लोकल सेवा सुरू झाली असून, मध्य रेल्वेने महत्त्वाची अपडेट दिला आहे. (Mumbai Local Trains Service Latest Update)

पहिल्याच पावसाने मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्याला झोडपून काढले. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले, तर काही ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले. 

मुंबई लोकल सेवेला ब्रेक

मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवेला फटका बसला. सोमवारी सकाळपासूनच कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी लोकल सेवा कोलमडून पडली. त्याचबरोबर पनवेलकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp