मुंबई लोकलमध्ये ‘दे दणा दण’! गळा पकडला अन्…; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

two passengers clashed Mumbai local Train, VIDEO Goes VIRAL
two passengers clashed Mumbai local Train, VIDEO Goes VIRAL
social share
google news

Mumbai Local Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई लोकल ट्रेनमधील हाणामाराच्या घटना सातत्याने चर्चेत येताहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. इतकंच नाही, तर गाणी, नृत्याचे रील बनवण्याचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. नव्याने एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात वेगाने धावत असलेल्या लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालाय. यात एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला गळा पकडून बाहेर ढकलताना दिसत आहे. (Two Passengers fight in Mumbai Local Train, video goes)

ADVERTISEMENT

‘अरे वेडा आहेस का… आत ये’

मुंबई मॅटर्स नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही व्यक्ती ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे आहेत. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. दोघांमधील वाद आणि भांडण इतके वाढला की दोघांपैकी एक दुसऱ्याला गळ्याला पकडून दाराबाहेर ढकलताना दिसत आहे.

हेही वाचा >> Dating app वर भेटलेल्या तरुणीला घरी आणलं अन् झाला ‘गेम’, रात्रीत काय घडलं?

यात खाली पडणारा माणूस कसंतरी ट्रेनच्या ग्रीलला धरून स्वतःला वाचवतो. हे पाहून इतर लोक ओरडू लागतात की, “अरे, वेडा आहेस का… आत या. त्यानंतरही दोघांमधील वाद पुन्हा सुरूच असतो.

हे वाचलं का?

व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येते की या घटनेत थोडीशी जरी चूक झाली असती, तर मोठा अपघात होऊन प्रवाशाला जीव गमवावा लागला असता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. एकजण म्हणाला की, “लोकल ट्रेनमध्ये हे रोजचेच झाले आहे.” दुसर्‍याने लिहिलं आहे की, “छोट्याश्या गोष्टीवरून तुम्ही एकमेकांना माराल का?”

हेही वाचा >> ‘अल्पवयीन मुलींना पाहून मी विचलित होतो..’ अन् वासनांध आरोपी जायचा मंदिरात!

ADVERTISEMENT

ट्रेनमध्ये धक्काबुक्की

मेट्रो असो की लोकल… ट्रेनच्या डब्यांमध्ये हाणामारी ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. अशा घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मुंबईत महिला धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी धोकादायक पद्धतीने धक्काबुक्की करताना आणि एकमेकाला मारताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> आत्याच्या मित्राचा भाचीवर बलात्कार, तर आत्या दुसऱ्या रुममध्ये भलत्याच तरुणासोबत…

त्याचबरोबर थापड मारण्याचे प्रकरणही समोर आले होते. त्यातच खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दोन महिला अचानक काही कारणावरून एकमेकांशी भिडल्या होत्या. हे प्रकरण केवळ वादावादीपर्यंतच मर्यादित राहिले नाही तर हाणामारीपर्यंत पोहोचले होते. एका महिलेने दुसर्‍या महिलेला जोरात थापड मारली, तेव्हा दुसरीनेही तिला थापड मारली. इतक्यावरच दोघी थांबल्या नाहीत. त्यांनी एकमेकींचे केसही ओढले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT