शेजाऱ्याला म्हणाले, ‘घरी मुलगी एकटीच आहे’; परत आल्यानंतर आईवडिलांना बसला धक्का
शेजाऱ्याच्या भरवशावर १२ वर्षाच्या मुलीला घरी एकटं सोडून आईवडील कामावर गेले. घरात अभ्यास करत बसलेल्या मुलीला बघून शेजाऱ्याची नियत फिरली अन् नको तेच झालं. शेजाऱ्याने मुलीवर अत्याचार केला आणि घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारू अशी धमकीही दिली. मुलीचे आईवडील कामावरून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. ऑनलाईन क्लास करत बसलेल्या एका १२ वर्षाच्या मुलीवर […]
ADVERTISEMENT

शेजाऱ्याच्या भरवशावर १२ वर्षाच्या मुलीला घरी एकटं सोडून आईवडील कामावर गेले. घरात अभ्यास करत बसलेल्या मुलीला बघून शेजाऱ्याची नियत फिरली अन् नको तेच झालं. शेजाऱ्याने मुलीवर अत्याचार केला आणि घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारू अशी धमकीही दिली. मुलीचे आईवडील कामावरून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.
ऑनलाईन क्लास करत बसलेल्या एका १२ वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे दिल्लीत. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यातील कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या १२ वर्षीय मुलगी आईवडिलांसोबत दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात राहते. पीडितेचे आईवडील एका कारखान्यात कामाला आहेत. बुधवारी मुलगी ऑनलाईन क्लासमुळे एकटीच घरी थांबली होती.










