Latur: पत्नीच्या प्रचार सभेतच पतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
अनिकेत जाधव, प्रतिनिधी (लातूर) 45 year old husband died of a heart attack in election campaign meeting: लातूर: तब्बल 32 वर्ष गावात आपल्याच चुलत भावाची असणारी सत्ता उलथवून टाकण्यासाठी 45 वर्षीय अमर पुंडलिक नाडे यांनी यंदा शड्डू ठोकला होता. थेट सरपंचपदासाठी (Sarpanch) त्यांनी आपल्या पत्नीलाच (Wife) निवडणुकीच्या (election) रिंगणात उतरवलं होतं. अनेक वर्ष चुलत भावाच्या […]
ADVERTISEMENT

अनिकेत जाधव, प्रतिनिधी (लातूर)
45 year old husband died of a heart attack in election campaign meeting: लातूर: तब्बल 32 वर्ष गावात आपल्याच चुलत भावाची असणारी सत्ता उलथवून टाकण्यासाठी 45 वर्षीय अमर पुंडलिक नाडे यांनी यंदा शड्डू ठोकला होता. थेट सरपंचपदासाठी (Sarpanch) त्यांनी आपल्या पत्नीलाच (Wife) निवडणुकीच्या (election) रिंगणात उतरवलं होतं. अनेक वर्ष चुलत भावाच्या हातात ग्रामपंचायत (Grampanchayat) असून देखील गावाचा फारसा विकास झालाच नाही असं अमर नाडेंना (Amar Nade) वाटत होतं त्यामुळेच आता आपण स्वत: भावाविरोधात रिंगणात उतरलं पाहिजे असं ठरवून अमर नाडेंनी नवा डावा माडंला होता. पण नियतीला हे काही मान्य नव्हतं. अन् अमर नाडेंनी मांडलेला डाव काळानं अर्ध्यातच मोडला… (45 year old husband died of a heart attack in a campaign meeting organized for his wife to be elected as sarpanch)
दुर्देवाची बाब अशी की, आपली पत्नी सरपंच म्हणून निवडून यावी, तिला तुम्ही भरघोस मतं असं म्हणून खाली बसलेल्या अमर नाडेंना अवघ्या काही क्षणात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्यांचा चटका अवघ्या मुरुड गावाला बसला आहे.
गिरीश महाजनांचा दणका : मिटकरींच्या गावातील राष्ट्रवादीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य अपात्र