Shiv Sena: ठाकरे गटाच्या शहरप्रमुखालाच घेतलं ताब्यात, काय घडलं?

फसवणूक, खोटी कागदपत्रं तयार करून जागा बळकावणे, खंडणी, कट रचणे अशा तब्बल अनेक कलमान्वये ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात उल्हासनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखविरोधात अखेर गुन्हा दाखल
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखविरोधात अखेर गुन्हा दाखल

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी (उल्हासनगर)

Case has been registered against an office bearer of Thackeray group: उल्हासनगर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv sena) गटाचे उल्हासनगरचे (Ulhasnagar) शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि इतर 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी राजेंद्र चौधरी यांना कालच रात्रीचं ताब्यात घेतलं आहे. मात्र अधिकृतपणे अद्यापही त्यांना अटक झालेली नाही. (a case has finally been registered against shiv sena thackeray groups city chief rajendra chaudhary)

जीवे ठार मारण्याची धमक्या देऊनही फिर्यादीचे वेगवेगळ्या कागदपत्रावर अंगठे घेऊन फिर्यादीस धनादेश दिल्याचे व्हिडीओ बनवून रक्कम त्यांच्याकडून परत घेऊन त्यांच्या मालकीचे जमिनीवर जेसीबीच्या सहाय्याने अनाधिकृत प्रवेश करून बांधकाम केलेले घर तोडून घरातील सामानाचे व कागदपत्राचे नुकसान केल्याचं पोलीस तक्ररीत म्हटलं आहे. ज्यामुळे राजेंद्र चौधरींविरोधात फसवणूक, खोटी कागदपत्रं तयार करून जागा बळकावणं, खंडणी, कट रचणे अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा विद्या वाघरी उर्फ वाघेला यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 363, 367, 368, 385, 387, 409, 420, 465, 467, 468, 471, 448, 452, 427, 504, 506 (2) 507, 120 (ब) 34 अशा तब्बल 15 कलमांनुसार राजेंद्र चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्ररारीत राजेद्र शांताराम चौधरी, गोदुमल नारायणदास कृष्णानी, प्रविण गोदुमल कृष्णानी, तुषार त्रिंबक बिंबलकर, सदानंद आनंदा शेटटी, उदय कृष्णाप्पा, पुरण कुकरेजा, विनोद म्हात्रे, धनशामदास सुंदरदास, मोहन लक्ष्मणदास, जयराम जेठानंद, जानकीबाई पुरूषोत्तम शर्मा, मधु गोपाळ खालसा, चंद्रा नारायण शेटटी आणि अशोक नायर यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. आहे.

ठाकरे गटाच्या शहरप्रमुखविरोधात अखेर गुन्हा दाखल
उल्हासनगर : रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

नेमकं प्रकरण काय?

आरोपी नं. 1 ते 8 यांनी आपसात संगनमत व कट रचून यातील फिर्यादी यांची वडीलोपार्जित असेलेली मिळकत ( प्लॉट नं. 170 सी, सीट नं. 32, सिटी सर्व्हे नंबर 12719, यु.नं. 35,39,40, 52, 53 अंदाजे क्षेत्रफळ 8312 चौरस मिटर उल्हासनगर-३ ) ही हडप करण्याचे उद्देशाने त्यांच्याकडे काम करीत असलेले व त्यांचे परिचयाचे आरोपी नं. 9 ते 15 यांच्या नावाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट सनद तयार करून सदर मिळकत व त्यांच्यालगत असलेल्या इतर मिळकती जबरदस्तीने कब्जा करून फिर्यादी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांवर दबाव टाकून जबरदस्तीने सदर मिळकत हस्तगत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादी अशिक्षित व गरीब असल्याचा फायदा घेत विठलवाडी रेल्वे स्टेशन लगत असलेल्या शिवसेना शाखेमध्ये जबरदस्तीने नेऊन त्या ठिकाणी फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीचे वेगवेगळ्या कागदपत्रावर अंगठे घेण्यात आले.

ठाकरे गटाच्या शहरप्रमुखविरोधात अखेर गुन्हा दाखल
खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचं उल्हास नगरमधलं कार्यालाय शिवसैनिकांनी फोडलं

तसेच फिर्यादीला धनादेश दिल्याचे व्हिडीओ शूट करण्यात आलं. ज्यानंतर त्यांना वांगणी येथील बँक आफ बडोदा, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया येथील बँकेत जबरदस्तीने नेण्यात आलं तिथे बँक खाते सुरु करुन सदर धनादेश वटवून पैसे काढल्याच्या व्हिडीओ बनवून पुन्हा सदरची रक्कम त्यांच्याकडून परत घेत त्यांच्याच मालकीच्या जमिनीत जेसीबीसह अनाधिकृत प्रवेश करून बांधकाम केलेले घर तोडून टाकले.

अखेर या सगळ्या प्रकाराला शिवसेनेचे स्थानिक नेते राजेंद्र चौधरी हे जबाबदार असल्याचे म्हणत फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. ज्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in