सायरस मिस्त्री अपघात प्रकरण : दोन महिन्यांच्या तपासानंतर जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

मुंबई तक

पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. तब्बल २ महिन्याच्या तपासानंतर या प्रकरणात मिस्त्री यांच्या गाडीच्या तत्कालिन चालक डॉ. अनाहिता पंडोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ दिवसांपूर्वी अनाहिता पंडोले यांचे पती डॅरियस पंडोल यांच्या जबाबानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. तब्बल २ महिन्याच्या तपासानंतर या प्रकरणात मिस्त्री यांच्या गाडीच्या तत्कालिन चालक डॉ. अनाहिता पंडोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ दिवसांपूर्वी अनाहिता पंडोले यांचे पती डॅरियस पंडोल यांच्या जबाबानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अनाहिता पंडोल यांच्यावर बेजबाबदारपणे वाहन चालविणे, सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी पळविणे, मानवी जीवाला धोका पोहचविणे या आरोपांच्या कलम 304(A) 279, 337, 338 आणि मोटार वाहन कायद्याच्या MVA – 112/183 ,184 या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांंनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला.

5 सप्टेंबर रोजी झाला होता अपघात :

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा 5 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्यासह त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांना देखील अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. हे दोघे गाडीत पाठीमागच्या सीटवर बसले होते. तर डॉक्टर अनाहिता पंडोल गाडी चालवत होत्या तर त्यांचे पती डॅरियस हे बाजूच्या सीटवर बसले होते. दोघेही गंभीर जखमी झाले होते. जहांगीर हे डॅरियस पंडोले यांचे लहान भाऊ होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp