उस्मानाबाद: छोट्या मुलाचं नाव ‘पंतप्रधान’, मोठ्याचं राष्ट्रपती; या पठ्ठ्याने तर कमालच केली!
गणेश जाधव, उस्मानाबाद सध्याच्या आधुनिक युगात आपला चिमुकल्या बाळांची नावं आगळ्या – वेगळ्या स्वरुपाची ठेवली जातात. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील दत्ता व कविता चौधरी यांनी आपल्या मुलाचे नाव चक्क ‘पंतप्रधान’ असे ठेवले आहे. नुकतंच नामकरण विधी पार पडला त्यावेळी चौधरी दाम्पत्याने आपल्या या नवजात बालकाचं नाव पंतप्रधान असं ठेवलं. विशेष म्हणजे […]
ADVERTISEMENT

गणेश जाधव, उस्मानाबाद
सध्याच्या आधुनिक युगात आपला चिमुकल्या बाळांची नावं आगळ्या – वेगळ्या स्वरुपाची ठेवली जातात. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील दत्ता व कविता चौधरी यांनी आपल्या मुलाचे नाव चक्क ‘पंतप्रधान’ असे ठेवले आहे. नुकतंच नामकरण विधी पार पडला त्यावेळी चौधरी दाम्पत्याने आपल्या या नवजात बालकाचं नाव पंतप्रधान असं ठेवलं. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ‘राष्ट्रपती’ आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती व पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत.
ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा पाळणा सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. पारंपारिक पद्धतीने महिला बाळाच्या कानात फुंकर मारुन त्याचं नाव ठेवतात.
अलीकडच्या काळात राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह आधुनिक नावे बाळाला देण्यात येतात. परंतु आता घटनात्मक दर्जा असलेल्या पदांची नावे देण्याची नवी पध्दत रुढ होऊ पाहत आहे. याची प्रचिती दत्ता व कविता चौधरी याच्या कुटुंबातील नामकरण सोहळ्याने समोर आली आहे.