Mumbai Cruise Drugs Bust: शाहरुख खानचा मुलगा Aryan Khan चा व्हीडिओ आला समोर

Mumbai Cruise Drugs Bust Aryan Khan Video: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची एनसीबीकडून चौकशी सुरु असताना आता एक व्हीडिओ समोर आला आहे.
Mumbai Cruise Drugs Bust: शाहरुख खानचा मुलगा Aryan Khan चा व्हीडिओ आला समोर
aryan khan questioning ncb office video viral mumbai cruise drug rave party case(फाइल फोटो)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने शनिवार मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये छापेमारी करुन ड्रग्स पार्टीचा भांडाफोड केला. या क्रूझमध्ये एनसीबीच्या टीमने प्रवासी म्हणून प्रवेश केला होता. क्रूझ भर समुद्रात पोहचात जेव्हा ड्रग्स पार्टी सुरु झाली त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी इथे छापा मारला. या पार्टीला बॉलिवूड, फॅशन आणि बड्या उद्योजकांची मुलं उपस्थित होती. त्यात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही होता. या प्रकरणी एनसीबी पार्टीतील लोकांसह आर्यन खानची देखील चौकशी करत आहे.

आर्यनचा व्हिडिओ आला समोर

मुंबईतील एनसीबी कार्यालयात आर्यन खान आणि इतरांची चौकशी केली जात आहे. अशा परिस्थितीत आर्यन खानचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे, ज्यात तो हातात बॅग घेऊन दिसत आहे. यामध्ये एक व्यक्ती आर्यनला काहीतरी सांगत असल्याचं देखील दिसून येत आहे. आर्यन खानने यावेळी पांढरा टी-शर्ट, लाल शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आणि काळा मास्क घातला आहे.

या पार्टीत अरबाज मर्चंट हा आर्यनचा मित्रही सहभागी होता. त्याची देखील आता चौकशी सुरू आहे. अरबाज सेठ मर्चंटचा ड्रग्स प्रकरणाशी खोल संबंध असल्याचे सध्या सांगितले जात आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अरबाजची चौकशी करत आहेत, तर आर्यन खानची चौकशी ही व्हीव्हीएस सिंग हे करत असल्याचं समजतं आहे.

या ड्रग पार्टीमध्ये लोकांच्या चपला, शर्टच्या कॉलर, बेल्ट याशिवाय काही जणांच्या अंतर्वस्रात देखील ड्रग्स आढळून आले आहेत. एनसीबीचे अधिकारी हे आर्यन खानसह पार्टीत सामील झालेल्या लोकांची चौकशी करत आहेत. आर्यनने एनसीबीला असे सांगितले की, या पार्टीला त्याला 'गेस्ट' म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. आपल्याला नावाचा या पार्टीसाठी वापर करण्यात आला असंही त्याने एनसीबीला सांगितलं आहे.

अरबाज सेठ मर्चेंट
अरबाज सेठ मर्चेंट
aryan khan questioning ncb office video viral mumbai cruise drug rave party case
क्रूज ड्रग्स पार्टी: Shah Rukh चा मुलगा Aryan ची चौकशी सुरूच, पाहा काय दिला जबाब

रिपोर्टनुसार, लोक चौकशीनंतर या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. तसेच ताब्यात घेतलेल्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किती लोकांना अटक केली जाईल याबाबत सध्या तरी एनसीबीचे अधिकारी काहीही उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. ताब्यात घेतलेल्या काही लोकांकडून थोड्या प्रमाणात मादक द्रव्ये जप्त करण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.