गडचिरोली: उमलत्या वयातील मुलांना नक्षल चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी कार्टूनमधून जनजागृती
व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्यात प्रशासन व पोलिसांच्या विरोधात नक्षली सतत दुष्प्रचार करत असतात. हा दुष्प्रचार कुमारवयातील मुलांपासून ते युवकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचविला जातो. यातूनच नक्षलवाद्यांना तरुणांची नवी रसद मिळत असते. या दुष्प्रचाराचा सामना करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आता नवे अनोखे अभियान सुरू केले आहे. यात ‘गडचिरोली फाईल्स’ या नावाने डिजिटल स्केचेस तयार केली जात […]
ADVERTISEMENT

व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्यात प्रशासन व पोलिसांच्या विरोधात नक्षली सतत दुष्प्रचार करत असतात. हा दुष्प्रचार कुमारवयातील मुलांपासून ते युवकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचविला जातो. यातूनच नक्षलवाद्यांना तरुणांची नवी रसद मिळत असते.
या दुष्प्रचाराचा सामना करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आता नवे अनोखे अभियान सुरू केले आहे. यात ‘गडचिरोली फाईल्स’ या नावाने डिजिटल स्केचेस तयार केली जात आहेत. लहान मुलांच्या कॉमिक्ससारख्या गोष्टींच्या माध्यमातून विविध संदेश प्रसारित केले जात आहेत.
स्थानिक गोंडी-मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेत दर पंधरवड्याला एक विषय हाती घेत त्यावर ही स्केचेस बनविली जाणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील हिंसक नक्षल चळवळीची सत्यस्थिती, त्याचे दुष्परिणाम जिल्ह्यातील विकास कामे- शासनाच्या विविध योजना अशा विविध विषयांवर या पुढच्या काळात या लक्षवेधी डिजिटल स्केचेस तयार केल्या जाणार आहेत.