शिवशाहिराला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी; बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जमलेल्या अलोट गर्दीने लाडक्या शिवशाहिराला साश्रुनयनांनी निरोप दिला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी पहाटे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत […]
ADVERTISEMENT

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जमलेल्या अलोट गर्दीने लाडक्या शिवशाहिराला साश्रुनयनांनी निरोप दिला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी पहाटे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.
बाबासाहेब पुरंदरे: ‘जाणता राजा’ कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा
14 नोव्हेंबरला सायंकाळी बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आली होती. उपचार सुरू होते, पण सोमवार शिवशाहिरांच्या निधनाचं वृत्त घेऊनच उजाडला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. त्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.