भाजपने ज्योतिषी बदलावा; आशिष शेलारांच्या ‘त्या’ विधानावरून थोरातांचा टोला

मुंबई तक

राज्यातील सत्तेतील तीनपैकी दोन पक्षांचे संकेत आमच्याकडे येत आहेत, असं सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं भाकित केलं होतं. शेलार यांनी केलेल्या विधानावरून राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलेल्या भाकिताविषयी बोलताना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील सत्तेतील तीनपैकी दोन पक्षांचे संकेत आमच्याकडे येत आहेत, असं सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं भाकित केलं होतं. शेलार यांनी केलेल्या विधानावरून राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलेल्या भाकिताविषयी बोलताना ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपकडून भाकीतं केली जाता आहेत. आता भाजपने ज्योतिषी बदलण्याची गरज आहे’, असा टोला थोरातांनी लगावला.

महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘नितीन गडकरी आणि शरद पवारांची भेट होऊ शकते. नितीन गडकरी यांना आम्ही राजकारणापलिकडे बघतो. राजकारण आणि विकास हे वेगवेगळं ठेवलं पाहिजे’, असं मत त्यांनी मांडलं.

मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही, संघर्ष करणार, नाना पटोलेंचा इशारा

मराठावाडा व विदर्भावर पूरपरिस्थिती ओढवली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या पूरग्रस्त भागांची आजपासून पाहणी करणार आहेत. त्याबद्दल बोलताना थोरात म्हणाले, ‘काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख मराठवाड्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना मदत करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला ओला दुष्काळ नाव द्यायचं की अजून काही हा नंतरचा विषय आहे. शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे पाहावं लागेल. मोजदाद केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. येत्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होऊन निर्णय होईल’, अशी माहिती त्यांनी दिली.

‘काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी’ शरद पवारांचं भाष्य खरं ठरतंय?

आशिष शेलार काय म्हणाले होते?

मावळ येथे बोलताना आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं होतं. ते म्हणाले होते, ‘ज्या पद्धतीनं तीन पक्षांत आपापसात विसंवादाची रोज लढाई सुरू आहे. त्या तीन पक्षातील दोन पक्षांचे संकेत आमच्याकडे येत आहेत. या सगळ्याचा अभ्यास केला, तर अनुमान असं काढता येऊ शकतं की राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल’, असं ते म्हणाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp