बीड : अवघं कुटुंब उद्ध्वस्त! २ वर्षाच्या मुलीसह पत्नीची हत्या; नंतर घेतला गळफास

सिरसाळ्यात खळबळ : पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू, घटनेचं कारण गुलदस्त्यात
बीड : अवघं कुटुंब उद्ध्वस्त! २ वर्षाच्या मुलीसह पत्नीची हत्या; नंतर घेतला गळफास
बीड जिल्ह्यातील घटना. (प्रातिनिधीक छायाचित्र)AajTak

आधी २ वर्षांच्या चिमुकलीसह पत्नाची गळा चिरुन हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील मोहा रोड परिसरात ही घटना घडली असून, घटनेनं खळबळ उडाली आहे. घटनेमागील कारण कळू शकलेलं नाही. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहा रोड परिसरात घडलेली ही घटना शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अल्लाबक्श शेख याने आपली पत्नी व दोन वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर गळफास घेऊन स्वत:चंही आयुष्य संपवलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आरोपी अल्लाबक्श शेख याने त्याची पत्नी व दोन वर्षाच्या मुलीची गळा चिरून हत्या केली.

रात्री १० च्या दरम्यान घटनेचं वृत्त शहरात पसरले. त्यानंतर सिरसाळयात प्रचंड खळबळ उडाली. घटनास्थळी एपीआय प्रदीप एकशिंगे यांच्यासह पीएसआय महेश विघ्ने यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मृतदेहांची तपासणी आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संबंधितांच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असं यावेळी सिरसाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in