सारंगखेड्यातला रावण घोडा ठरतोय चर्चेचा विषय, पाच कोटींची बोली

सारंगखेड्यातला रावण घोडा ठरतोय चर्चेचा विषय, पाच कोटींची बोली

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सध्या सुरू असलेल्या यात्रा उत्सवातील अश्व प्रदर्शनात नाशिक येथून आणला रावण घोडा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तसंच या घोड्याचं कौतुकही मोठ्या प्रमाणावर होतं आहे तो कुतुहलाचा विषयही ठरतो आहे.

सारंगखेडा येथील घोड्यांची जत्रा, बाजार हा देशभरात प्रसिद्ध आहे. या जत्रेत संपूर्ण राज्यभरातून विविध भागातून घोडे विक्रीसाठी दाखल होतात. यंदा नाशिक येथून आलेला रावण घोडा सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.

तब्बल 67 इंच एवढी उंची असलेला हा रावण घोडा संपूर्ण काळ्या रंगाचा आहे. त्याच्या कपाळावर एक पांढरा ठिपका आहे, त्याला देवमणी कंठ, कुकड आणि नगाडा पुठ्ठा अशी शुभ लक्षणे आहेत. या घोड्याच्या देखभालीसाठी दोन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक येथील असद सय्यद यांच्या मालकीच्या घोड्याला तब्बल पाच कोटी रुपयांपर्यंतची किंमत देत विचारणा झाली आहे. मात्र घोड्याची विक्री करण्यास असद सय्यद यांनी नकार दिला आहे.

रावण घोड्याचा दिवसाचा खुराक

सारंगखेडा यात्रेतील चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असलेला रावण घोड्याला दिवसाला दहा लिटर दूध, चणा डाळ एक किलो, गावरान तूप आणि गावरानी बाजरी तसेच सुकामेवा असा खुराक दिला जातो.

नाशिकहुन सारंगखेडा घोडे बाजारात पहिल्यांदाच आलेल्या रावण घोड्याचे मालक असद सय्यद यांनी एकूण 10 घोडे विक्रीसाठी आणले असून त्यातील बुलंद या घोड्याची किंमतही 1 कोटी आहे. तर रुस्तम नावाच्या घोड्याची किंमत दीड कोटी आहे. पंजाब जातीच्या नुकरा घोड्याचे वय 34 महिने आहे. पांढरा शुभ्र, शुभलक्षणे असल्याने हा घोड़ा आकर्षण ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in