BJP आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात, गाडी पुलावरुन 30 फूट खाली कोसळली

इम्तियाज मुजावर

सातारा: साताऱ्यातील (Satara) माणचे भाजप आमदार (BJP MLA) जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला फलटणजवळ पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात (accident) झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. त्यांची गाडी पुलावरुन तब्बल 30 फूट खोल पडली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली असल्याचंही समजतं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सातारा: साताऱ्यातील (Satara) माणचे भाजप आमदार (BJP MLA) जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला फलटणजवळ पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात (accident) झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. त्यांची गाडी पुलावरुन तब्बल 30 फूट खोल पडली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली असल्याचंही समजतं आहे. (bjp mla jayakumar gores tragic accident car falls 30 feet from the bridge satara)

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजून 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. आमदार गोरे यांच्या फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, जिथे झालं उद्घाटन तिथंच घडली घटना

ज्यावेळी गाडीला अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह एकूण चार जण प्रवास करत होते. अपघातात या चारही जण जखमी झाले आहेत. आमदार गोरे यांच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं असून त्यांना सध्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर गाडीमधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp