अफझल नाव सांगून विष्णूनं दिली थेट मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५६ वर्षीय विष्णू भौमिक यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Mukesh ambani threaten on phone
Mukesh ambani threaten on phone

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५६ वर्षीय विष्णू भौमिक यांना पोलिसांनी अटक केली आहे. डीसीपी नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेला व्यक्ती हा व्यवसायाने ज्वेलर्स असून त्याचे दक्षिण मुंबईत दुकान आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करताना त्याने आपले नाव अफजल असे सांगितले होते.

9 वेळा केले धमकीचे फोन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती दहिसरचा रहिवासी आहे आणि त्याने सोमवारी सकाळी 10.39 ते दुपारी 12 वाजेदरम्यान एक-दोन नव्हे तर नऊ वेळा रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये कॉल केले. आणि फोनवरून त्याने आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी मारण्याचा इशारा दिला. मुकेश अंबानी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी त्याने फोनवरून दिली.

धमकीच्या फोनमुळे केंद्रीय यंत्रणाही झाल्या सतर्क

मुंबईतील गिरगाव परिसरात असलेल्या रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात सकाळी १०.३९ च्या सुमारास पहिला कॉल करताना या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींनाच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी कलम ५०६ (२) अन्वये फौजदारी धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काही केंद्रीय यंत्रणांनीही यासंदर्भात माहिती घेतली आहे.

पोलीस करतायेत अधिक तपास

डीएम मार्ग पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे डीसीपी नीलोत्पल यांच्या वतीने आरोपीच्या कोठडीबाबत सांगण्यात आले की, विष्णू विभू भौमिकला बोरिवली पश्चिम येथून पकडून डीएम मार्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. येथे त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड देखील तपासण्यात येत आहेत. ते म्हणाले की, धमक्या देताना या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींचेच नाव घेतले नाही, तर एकदा कॉलमध्ये धीरूभाई अंबानींचे नावही वापरले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in