टाळूवरचं लोणी खाणारे महाभाग! पुण्यात उघडकीस आला स्मशान घोटाळा
पुणे महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे एक उदाहरण समोर आलं आहे. आतापर्यत आपण पाहिले असेल की आधी घोटाळे झाल्यानंतर आरोप केले जात असत. मात्र आता पुण्यात एक वेगळाच घोटाळा समोर उघड़कीस आला आहे. काम झालं नाही तरीही एक कोटी रूपयांचं पेमेंट केलं जाणार होतं. पुणे शहरातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी, हडपसर येथील अमरधाम, कोथरूड आणि […]
ADVERTISEMENT

पुणे महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे एक उदाहरण समोर आलं आहे. आतापर्यत आपण पाहिले असेल की आधी घोटाळे झाल्यानंतर आरोप केले जात असत. मात्र आता पुण्यात एक वेगळाच घोटाळा समोर उघड़कीस आला आहे. काम झालं नाही तरीही एक कोटी रूपयांचं पेमेंट केलं जाणार होतं.
पुणे शहरातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी, हडपसर येथील अमरधाम, कोथरूड आणि बाणेर येथील स्मशानभूमीमधील विद्युत विषयक कामांचे एकूण एक कोटींच्या रक्कमेचे बिल अदा करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन बिल अदा करण्यात यावे असा शेरा विभागाकडून देण्यात आलेला होता. मात्र ज्या विद्युत विभागाचे हे काम होतं त्यांना याची कुठलीच कल्पना नव्हती जेव्हा या कामांची विचारणा त्यांच्याकडे झाली तेव्हा असं कुठलंही कंत्राट दिलेलेच नसल्याचा खुलासा झाला. आता या प्रकरणी पुणे महापालिकेने ठेकेदाराविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.
कोव्हिडच्या काळात कुठलीही निविदा नसताना आशय इंजिनिअरींग आणि असोसिएटस यांनी पालिकेकडे चार स्मशानभूमीच्या विद्युत कामांसाठीचे एक कोटी रुपयांचे बिल सादर केलं. विद्युत विभागात या बिलाची फाईल इनवर्ड झाल्यानंतर ते कनिष्ठ अभियंता,उप अभियंता , कार्यकारी अभियंता , अधीक्ष अभियंता ह्यांच्या सह्या असलेले 25 लाखांची चार बिलं , म्हणजेच एक करोड़ रूपयाचे बिल्स विद्युत विभागाकडून जावक करुन , आरोग्य विभागात कोव्हिड 19 च्या तरतूद घेण्याचा प्रयत्न करत असतांना , सदर बिलाचे मुख्य अभियंताच्या लक्षात आल्याने , पेमेंट ताबड़तोप थांबविन्यात आले. जानेवारी महिन्यांत ही कामे केल्याचे दाखवून त्यासंबधीची सर्व मंजुरीची हुबेहुब कागदपत्रे या फाईलमध्ये जोडण्यात आली होती.