जर्मनीत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष; पुण्याच्या ढोल-ताशा पथकाने जर्मनीकरांची मने जिंकली
यावर्षी जर्मनी येथील एरलांगन शहरात प्रथमच ढोल, ताशा व झांज पथकाच्या निनादात आणि लेझीम ठेक्यात पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. मराठी विश्व फ्रांकेन,जर्मनी आयोजित या कार्यक्रमासाठी रमणबाग युवा मंच, या ढोल-ताशा पथकाला जर्मनी येथे पाचारण करण्यात आले होते. ढोल ताशा पथकाने पुण्याचा अलका चौक डोळ्यापुढे उभा केला. १८ जणांच्या ढोल, ताशा व झांज […]
ADVERTISEMENT

यावर्षी जर्मनी येथील एरलांगन शहरात प्रथमच ढोल, ताशा व झांज पथकाच्या निनादात आणि लेझीम ठेक्यात पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. मराठी विश्व फ्रांकेन,जर्मनी आयोजित या कार्यक्रमासाठी रमणबाग युवा मंच, या ढोल-ताशा पथकाला जर्मनी येथे पाचारण करण्यात आले होते. ढोल ताशा पथकाने पुण्याचा अलका चौक डोळ्यापुढे उभा केला. १८ जणांच्या ढोल, ताशा व झांज पथकासोबत ३८ महिला व पुरुष गटाने लेझीम सादर करून उपस्थित जर्मन आणि जर्मनीस्थित भारतीय गणेश भक्तांची मने जिंकली.
चिमुकले दिसले महापुरुषांच्या वेशभूषेत
कार्यक्रमात छोट्या मुलांनी महापुरुषांची वेशभूषा करून हजेरी लावली आणि उपस्थितांना मिनी इंडिया चे दर्शन करून दिले. कार्यक्रमाअंतर्गत मुलांना शाडू माती पासुन गणपती मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये २५ मुलांनी सहभाग घेऊन छान व सुबक गणेश मूर्ती तयार केल्या. या भारतीय मुर्तिकारांसोबत जर्मनीच्या नागरिकांनाही फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही .
पारंपरिक पद्धतीने जर्मनीत गणरायाची स्थापना