वाढत्या रूग्णसंख्येबाबत आणि निर्बंधांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन, म्हणाले….
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. राज्यात वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोर पालन करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसंच जे लोक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य काय म्हणाले […]
ADVERTISEMENT

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. राज्यात वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोर पालन करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसंच जे लोक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य
काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
‘कोरोना विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्यासुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. आपल्याला कुठलाही लॉकडाउन करून सगळं ठप्प करायचं नाही. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही. पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करत नियमांचं पालन करावं.’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.