कोरोनामुळे बाललैंगिक अत्याचार आणि विधवांचं प्रमाण वाढत आहे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभर कोरोनामुळे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होताना पहायला मिळताहेत. यात लहान मुलं आणि महिला भरडले जात आहेत. कोरोनाने उध्वस्त झालेल्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या लहान मुलांवर शारिरीक आणि लैंगिक अत्याचर होतो. महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या काही राज्यांमध्ये हे भयाण वास्तव असल्याचं समोर येत आहे. एका वर्षात ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असं मतही मुलं आणि महिलांबरोबर काम करणाऱ्या संस्था मांडत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबच्या कुटुंबात संसर्ग होताना पहायला मिळाला. ज्यामुळे कुटुंबात एकापेक्षा अनेक मृत्यू होताहेत. काही कुटुंबामध्ये पालकांचा मृत्यू झाल्याने मुलं मागे राहतात. तर काही कुटुंबामध्ये पतीच्या मृत्यूनंतर महिला आणि मुल मागे राहिल्याने त्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण होतो अशी माहिती दिल्लीच्या प्रोत्साहन इंडिया फाउंडेशन या संस्थेने दिली आहे. प्रोत्साहन इंडिया फाउंडेशन ही संस्था बाल अत्याचार या विषयावर लोकांमध्ये जाऊन काम करते. संस्थेच्या संस्थापक संचालक सोनल कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसाला संस्थेच्या कार्यालयात तर एका तासात मदतीसाठी 19 फोन कॉल येतात. त्या प्रामुख्याने विधवा महिला असतात आणि त्यांच्यासमोर कुटुंब चालविण्याचा आणि मुलांचं पोषण करण्याचा प्रश्न असतो. ” या दुसऱ्या लाटेमध्ये बँगलोर, उत्तर पूर्व भागातील राज्य आणि पश्चिम बंगाल या राज्यातून सर्वाधिक फोन येतात,” अशी माहिती सोनल कपूर यांनी दिली आहे. “कोव्हिडमुळे दोन्ही पालक गेल्यामुळे मुलं अनाथ झाल्याची प्रकरण 8 ते 10 टक्के आहेत. मात्र 90 टक्के प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांचे बाल अधिकारांचं उल्लंघन झाल्याची प्रकरणं आढळत आहेत. पत्नी वारल्यानंतर एकटा पुरुष मागे राहिल्याने मुलांना सांभाळण्याचा प्रश्न उद्भवतो” असं सोनल सांगतात

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अनाथ बालकांची तस्कारी होऊ नये म्हणून सतर्क रहायला हवं

मुंबईतल्या बाल आशा संस्थेसाठी काम करणारे सुनिल अरोरा यांच्यामते ‘कोव्हिडमुळे अनाथ झालेली मुलं ही एक समस्या येत्या काळात आणखी मोठी होऊ शकते. यासाठी या समस्येकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण एकट्या राहणाऱ्या मुलांची बेकायदेशीरपणे दत्तक दिली जात असल्याचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर फिरताना आढळत आहेत. अशा मुलांची तस्करी होऊ शकते. यासाठी जागरुक राहण्याची आवश्यकता आहे’

ADVERTISEMENT

झोपडपट्ट्यांमध्ये बाल लैंगिक शोषण वाढले

ADVERTISEMENT

सोनल यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये महिलेला कोव्हिड झाला किंवा तिचा मृत्यू झाला तर बाप अनेकदा लहान मुलींवर बलात्कार करत असल्याच्या घटना समोर आल्याचं सोनल कपूर यांनी सांगितलं.

ट्रान्सेशनला सेक्सवर्कमध्ये मुलं

कोव्हिड काळामध्ये मुलांना ट्रान्सेसनल सेक्समध्ये लोटण्यात येत आहे. ज्यामध्ये मुलांना काही तासांसाठी कोणाकडे तरी पाठवलं जातं. जिथे मुलांचं शोषणं केलं जातं आणि त्याबदल्यात पीठ, तांदूळ, बटाटे, तेल असे जिन्नस दिले. जातात. मग मुलांना त्यांच्या घरी पाठवलं जातं. अशी माहिती प्रोत्साहन इंडिया फाउंडेशनच्या सोनल यांनी सांगितलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT