आदित्य ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाणाचा आरोप करत पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

आदित्य ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाणाचा आरोप करत पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी आदित्य ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप करत अकोल्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार युवासेना अकोला जिल्हा च्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही तक्रार दाखल करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेंबद्दल 'सकाळ' वृत्तपत्रात एक लेख छापण्यात आला आहे. सदर लेख हा मृणालिनी नानिवडेकर यांनी लिहिलेला असून त्यामधील काही मजकूर हा विकृत मनोवृत्तीने लिहिला गेला आहे असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीची तक्रार अकोला जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत जी यांच्याकडे अकोला युवासेना तर्फे करण्यात आली.

यावेळी युवा अधिकारी विठ्ठल सरप पाटील, दीपक बोचरे उपजिल्हायुवाधिकारी योगेश बुंदेले, राहुल सुरेशराव कराळे, महानगर प्रमुख नितीन मिश्रा, नगरसेवक शशी चोपडे शिवसेना शहर संघटक तरुण बगेरे, पंकज गवई, डॉ. शर्मा आणि शिवसैनिक उपस्थित होते.

आदित्याय नम: या संपादकीयातील आक्षेप घेण्यात आलेला तो मजकूर नेमका काय?

मुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या वडिलांवर शस्त्रक्रिया झाली तेंव्हा आदित्य परदेशात पर्यावरणबदल परिषदेचे निमंत्रण मिळवून हजर झाले. त्यांचे तसे बाहेर जाणे काही विशिष्ट हेतूंनी असावे,जोडलेल्या धनाचे व्यवस्थापन करण्यासाठी ते बाहेर होते, अशी कुजबूज झाली. आवश्यक होते म्हणून आदित्य यांना बरेच काही करावे लागत असावे. सध्या ते सक्रिय दिसतात. लग्नसमारंभ ,संमेलने यात हजेरी लावताना दिसतात. नेता होण्यासाठी तेवढेच पुरते काय? आजाराने थकलेले बाबा पुन्हा कार्यरत होतील; पण मुलाला लॉंच करण्याची त्यांची इच्छा आता लपलेली नाही. बिजू नवीन पटनाईक ,करुणानिधी, स्टालिन या पितापुत्रांच्या जोड्या मुख्यमंत्रीपद सांभाळत्या झाल्या. त्यांच्या प्रादेशिक पक्षांना तेथे लोकांचे पाठबळ मिळाले. शिवसेना असा एकछत्री अंमल गाजवू शकेल?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in