उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंबाबत भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट,पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी भाजपचे सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांना पोलिसांनी नोटीस बजावली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही करण्यात आली. जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय ट्विट जितेन गजारिया यांनी केलं?

भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले आहेत. या ट्विटवरुन आता सायबर सेल विभागाने जितेन गजारिया यांना नोटीस पाठवली असून त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं. या ट्विटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्विट केलं आहे. आता या ट्विटमागे आणि त्यामधील मजकूरामागे काय हेतू होता याबद्दल पोलीस चौकशी करत असून गजारिया यांचा जबाब नोंदवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री असतील तर मी काय……. करण्यासाठी आहे आहे असं आक्षेपार्ह ट्वि जितेन गजारिया यांनी केलं होतं. हे ट्विट आता डिलिट करण्यात आले आहेत. मात्र या आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी जितेन गजारिया यांच्यावर कारवाई झाली आहे.

विद्या चव्हाण यांचा खोचक टोला

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी यावर व्यक्त होताना, बरं झालं राबडीदेवींची उपमा दिली, फडणवीसांच्या बायकोची नाही दिली, नाहीतर ती ‘डान्सिंग डॉल’ अशीच लोकांची प्रतिमा झाली असती अशी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बायकोविषयी तक्रार करताना तुमच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळले त्याविषयी ट्विट केलं तर बरं होईल. उगाचच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राजकारणात ओढणं बरं नाही. लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवींना मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं असेल तर आपल्याला त्याचं कौतुकच वाटलं पाहिजे.

ADVERTISEMENT

परंतु ज्या प्रकारे रश्मी ठाकरेंचं नाव घुसवण्याचं काम केलं जात आहे, त्यावरून भाजपच्या सोशल मीडिया सेलला अक्कल राहिली नाही हे लक्षात येतं. ते डबक्यात आहेत. कमळ हे डबक्यात उगवतं. डबक्यातील लोकांनी दुसऱ्यांवर शिंतोडे उडवू नये. कारण तुम्ही डबक्यात आहात. तुम्ही काय आहात, भाजपमध्ये कोण काय आहे त्याविषयी आम्हाला सर्व माहिती आहे. कोणत्याही नेत्याच्या पत्नीवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही विद्या चव्हाण यांनी दिला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT