हरयाणातील सुपर बुल सुल्तानचं निधन; सुल्तानवर लागली होती 21 कोटींची बोली
21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तान रेड्याचं निधन झालं आहे. पंजाबमधील एका रेड्याची काही वर्षांपूर्वी चांगलीच चर्चा झाली होती. त्याचं नाव होतं सुल्तान. मर्सिडिज कारपेक्षा जास्त महाग असलेला रेडा म्हणून सुल्तानची चर्चा रंगली होती. त्या रेड्याचं निधन झालं आहे. हरियाणातल्या कैथल या रेड्याचा थाट वेगळा होता. सुल्तानमुळे जगभरात त्याचं नाव आणि त्याच्या मालकाचं नाव म्हणजेच बेनिवाल […]
ADVERTISEMENT

21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तान रेड्याचं निधन झालं आहे. पंजाबमधील एका रेड्याची काही वर्षांपूर्वी चांगलीच चर्चा झाली होती. त्याचं नाव होतं सुल्तान. मर्सिडिज कारपेक्षा जास्त महाग असलेला रेडा म्हणून सुल्तानची चर्चा रंगली होती. त्या रेड्याचं निधन झालं आहे. हरियाणातल्या कैथल या रेड्याचा थाट वेगळा होता. सुल्तानमुळे जगभरात त्याचं नाव आणि त्याच्या मालकाचं नाव म्हणजेच बेनिवाल यांचं नाव चर्चेत आलं होतं. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे.
सुल्तानसारखा रेडा पुन्हा होणार नाही असं त्याच्या मालकाने म्हटलं होतं. सुल्तानच्या वीर्यापासून वर्षाला लाखो रूपयांची कमाई करत होत होती. सुल्तान वर्षभरात वीर्याचे शेकडो डोस देत होता. 2013 मध्ये झालेल्या राष्ट्रीय पशू सौंदर्य स्पर्धेत सुल्तान विजेता ठरला होता. राजस्थानच्या पुष्कर मेळ्यामध्ये एका पशू प्रेमीने सुल्तानची एकवीस कोटी रूपये बोली लावली होती. मात्र नरेश बेनीवाल म्हणाले कितीही बोली लावली तरीही मी रेडा विकणार नाही कारण मी त्याला माझ्या मुलासारखं मानतो.