कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’
Kasba Peth Assembly by-election : पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Peth Assembly by-election) भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा इथून मोठा पराभव झाला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवाने पुण्यात भाजपचे […]
ADVERTISEMENT

Kasba Peth Assembly by-election :
पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Peth Assembly by-election) भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा इथून मोठा पराभव झाला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवाने पुण्यात भाजपचे सर्वच दिग्गज फेल ठरल्याचं बोललं जातं आहे. या दरम्यान आता राज्यातील भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील जनतेकडे ‘आम्ही पुन्हा येऊ’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis reaction on Kasba Peth Assembly by-election)
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, चिंचवड विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार अश्विनीताई जगताप विजयी झाल्या. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार! स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे. तर कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’! असं ते म्हणाले.
कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो.
पण, एक नक्की सांगतो,
आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!#KasbaByElection #BJP— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 2, 2023