डोंबिवली : ९ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष देत बोलावलं घरात, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
डोंबिवली पश्चिम भागातील घटना...

डोंबिवली : ९ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष देत बोलावलं घरात, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

विष्णुनगर पोलिसांनी केले पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीस ठोकल्या बेड्या

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत महिला सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत राज्याचं महिलांवरील अत्याचारांच्या गंभीर घटना घडल्या. अशाच एका घटनेनं डोंबिवली एकदा चर्चेत आलं. डोंबिवली पश्चिमेत एका अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

डोंबिवली पश्चिम भागातील घटना...
डोंबिवली Gang Rape अल्पवयीन मुलीचा जबाब काय?

आरोपीने घरात कोणी नसताना चॉकलेटचा आमिष दाखवत ९ वर्षीय मुलीला घरात बोलवून घेतलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. विष्णुनगर पोलिसांनी आरोपीस अवघ्या चार तासांत अटक केली.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने झुमर दाखवण्यासाठी घरी बोलावलं. त्यानंतर चॉकलेटचं आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याचा प्रयन्त केला.

डोंबिवली पश्चिम भागातील घटना...
'नवरा नको वाटतो, तर ये माझ्याजवळ' म्हणून बापच छळायचा; दोघांनी जेवण देतो म्हणून केला बलात्कार

यासंबंधी माहिती विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपीला चार तासांत मोठागाव खाडी येथे अटक केले. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालेराव यांनी ही माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in