डोंबिवली: भर रस्त्यात गळ्यावर चाकू लावत बॅंक मॅनेजरला लुटलं, भुरटे चोर CCTV मध्ये कैद

dombivli crime bank manager robbed on the street thief caught on cctv
dombivli crime bank manager robbed on the street thief caught on cctv

डोंबिवली: ठाकुर्ली परिसरात एका बॅंक कर्मचाऱ्याला भर रस्त्यात लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवून या बँक मॅनेजरला लुटण्याची घटना डोंबिवली नजीकच्या ठाकुर्ली परिसरात घडली आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईतील एका खाजगी बँकेत मॅनेजर पदावर असलेले संतोषकुमार शर्मा हे ठाकुर्ली परिसरातील चामुंडा गार्डनमध्ये राहतात. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांच्या आसपास संतोषकुमार 90 फुटी रस्त्याने घरी जात होते. यावेळी मास्क परिधान केलेल्या चार ते पाच लुटारूंनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि काही क्षणातच त्यांना घेरले.

त्यांच्या गळ्यावर चाकू लावत आणि धमकी देत त्यांना चोरट्यांनी लुटलं. यावेळी त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल, क्रेडिट कार्ड. येस बँकेचे एटीएम घेऊन ते सर्व लुटारू तेथून पसार झाले. याप्रकरणी संतोषकुमार शर्मा यांनी या लुटीची पोलिसांना तातडीने माहिती दिली आणि रामनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल केली आहे.

पोलिसांनी लागलीच परिसरातील सीसीटीव्ही तपासले असून याप्रकरणी अधिक तपास सुरु केला. सीसीटीव्हीमध्ये पाच आरोपी स्पष्टपणे दिसत आहे. त्यातील एका चोरट्याकडे लुटलेली बॅग आहे. दरम्यान, यापूर्वीही ठाकुर्लीमधील 90 फुटी आणि समांतर रस्त्यावर रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

dombivli crime bank manager robbed on the street thief caught on cctv
पुणे: विमानाने पुण्यात यायचे अन् चोरी करायचे, श्रीमंत चोरटे कसे सापडले पोलिसांच्या जाळ्यात?

त्यामुळे या परिसरात एक पोलीस चौकी उभी करावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, अद्याप तरी याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in