आता ईडीचा मोर्चा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसकडे; या प्रकरणात केलं आरोपी
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचे बुधवारी आर्थिक तपास एजन्सी (ईडी) ने सुकेश चंद्रशेखर याच्या 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी म्हणून नाव समावेश करण्यात आलं. सुकेश चंद्रशेखर हा खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलीनला होती आणि ती खंडणीतून मिळणाऱ्या रकमेची लाभार्थी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईडीने केली चार्जशीट दाखल ईडीने […]
ADVERTISEMENT

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचे बुधवारी आर्थिक तपास एजन्सी (ईडी) ने सुकेश चंद्रशेखर याच्या 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी म्हणून नाव समावेश करण्यात आलं. सुकेश चंद्रशेखर हा खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलीनला होती आणि ती खंडणीतून मिळणाऱ्या रकमेची लाभार्थी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ईडीने केली चार्जशीट दाखल
ईडीने आज जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. वसुलीच्या पैशाचा फायदा जॅकलिनलाही झाला असून सुकेश हा गुन्हेगार असल्याचे तिला माहीत होते, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ईडीने जॅकलीनला पूर्णपणे वेठीस धरले आहे.
या कारणावरून ईडीने जॅकलिनवर आरोप केले