Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंचा इशारा, एकनाथ शिंदेंना हसू अनावर, म्हणाले…

मुंबई तक

Eknath shinde On CM Uddhav Thackeray Khed Speech : उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या देशद्रोही विधानावरून शिंदेंना लक्ष्य केलं. ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Eknath shinde On CM Uddhav Thackeray Khed Speech : उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या देशद्रोही विधानावरून शिंदेंना लक्ष्य केलं. ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर जनतेच्या आणि ईश्वराच्या आशीर्वादाने हे सगळं घडलं. त्यामुळे जनतेचे आशीर्वाद आणि देवदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आशीर्वाद यात्रा होती. त्याला लोकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खऱ्या अर्थाने आम्ही गेल्या सहा-सात महिन्यात मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे आणि कामंही सुरू झाली आहे. त्याची पोचपावती लोकांनी प्रतिसाद देऊन व्यक्त केली आहे. ही शिवसेना भाजप युती सरकारच्या कामाची पोचपावती आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीला आशीर्वाद यात्रेबद्दल म्हणाले.

ठाकरेंच्या सभेला शिंदेंनी काय दिलं उत्तर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “खरंतर तोच शो होता. तीच कॅसेट होती. तोच थयथयाट होता, फक्त जागा बदलली होती. बाकी काही नवीन मुद्दे नव्हते. आरोप प्रत्यारोप करण्याची ही चढाओढ तिथे पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने एवढंच सांगेन की, बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही कुणाचीही खासगी प्रॉपर्टी नाही.”

“आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही, पण त्यांचे विचार आम्ही पुढे नेतोय. त्यामुळे ही त्यांची खासगी प्रॉपर्टी नाही. बाळासाहेबांचं एक कर्तृत्व होतं. वडील-वडील करून त्यांना कुणी छोटं करू नये. एवढंच माझं सांगणं आहे. त्यामुळे आज पाहतोय आपण की खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासोबत, शिवसेनेसोबत आहेत”, असा दावा शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर देताना केला.

Shiv Sena UBT: “मोदींची मुक्ताफळे देशाची बदनामी नव्हती तर काय?”

हे वाचलं का?

    follow whatsapp