LPG Cylinder Price Hike: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका, सिलेंडर महागला

मुंबई तक

मुंबई: LPG Price Hike: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्यांना मोठा झटका दिला आहे. कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची (commercial cylinder) किंमत तब्बल 43.5 रुपयांनी वाढवली आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे इत्यादी ठिकाणचे पदार्थ आणखी महाग होऊ शकतात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत ही 1693 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: LPG Price Hike: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्यांना मोठा झटका दिला आहे. कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची (commercial cylinder) किंमत तब्बल 43.5 रुपयांनी वाढवली आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे इत्यादी ठिकाणचे पदार्थ आणखी महाग होऊ शकतात.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत ही 1693 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी याची किंमत 1650 रुपये होती. दरम्यान, घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलेंडर किंमतीत काहीही बदल झाल्याने सामन्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपये झाली आहे. पूर्वी ती 1693 रुपये होती.

कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत सर्वाधिक 1805.5 रुपये झाली आहे. पूर्वी याची किंमत ही 1770.5 रुपये होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेतात आणि त्यानुसार त्यामध्ये बदल करतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp