Maharashtra Flood: पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत! फडणवीसांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी
योगेश पांडे, प्रतिनिधी महाराष्ट्रात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना पुराचा फटका बसला. या पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत, या मागणीसाठी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते. पुराच्या स्थितीमुळे कोकण आणि पश्चिम […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी
महाराष्ट्रात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना पुराचा फटका बसला. या पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत, या मागणीसाठी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.
पुराच्या स्थितीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झालेल्यांना विमा कंपन्यांकडून पैसे लवकरात लवकर मिळावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विनंती केली. त्यामुळे मोठा दिलासा दुकानदारांना मिळू शकेल. एखाद्या बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यास त्या स्थितीत बँकेच्या खातेधारकांना आता 1 लाख रूपयांऐवजी 5 लाख रूपये काढता येणार आहेत. अर्थात 5 लाखांपर्यंतची त्यांची गुंतवणूक सुरक्षित होणार आहे. या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी निर्मला सीतारामन यांचे मन:पूर्वक आभार मानले. यासंदर्भातील विधेयक सुद्धा संसदेत पारित झाले, ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे लघु ठेविदारांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबईतील स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करता यावा, यासाठी राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांना परवानगी देण्यात यावी आणि यासंदर्भातील प्रक्रियेला गती देण्यात यावी, अशी मागणी सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आवास योजनांना गती देण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण हाती घेतले असताना मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्विकास करताना अनेक अडचणी येतात.