महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी Corona रूग्णसंख्येत घट, 2844 नवे रूग्ण
महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसभरात 2844 नव्या रूग्णांची नोंद दिवसभरात झाली आहे. सोमवारी ही संख्या 2432 इतकी होती. दरम्यान आज दिवसभरात देशातही साडेसहा महिन्यांनी कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट पाहण्यास मिळाली. महाराष्ट्रात दिवसभरात 3029 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 65 हजार 277 कोरोना बाधित […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसभरात 2844 नव्या रूग्णांची नोंद दिवसभरात झाली आहे. सोमवारी ही संख्या 2432 इतकी होती. दरम्यान आज दिवसभरात देशातही साडेसहा महिन्यांनी कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट पाहण्यास मिळाली.
महाराष्ट्रात दिवसभरात 3029 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 65 हजार 277 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.26 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 60 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
Corona Update: तब्बल साडेसहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 5 कोटी 84 लाख 29 हजार 804 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 44 हजार 606 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 54 हजार 985 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर 1514 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.