bridge collapse in morbi : भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू, मृतांचा आकडा १४१ वर

bridge collapse in gujarat update : गुजरातमधील मोरबीमध्ये झुलता पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना, मृतांचा आकडा वाढला, मदतकार्यासाठी लष्करालाही पाचारण
Gujarat  morbi bridge collapse latest updates
Gujarat morbi bridge collapse latest updates

bridge collapse in morbi gujarat News : गुजरातमधल्या मोरबी येथे रविवारी रात्री मृत्यूने अक्षरशः तांडव घातलं. मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १४० वर्ष जुना झुलता पूल (केबल ब्रिज) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाला असून, पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४१ वर पोहोचला आहे.

मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १४० वर्ष जुना झुलता पूल दुरुस्ती करण्यात आल्यानंतर ५ दिवसांपूर्वी नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. पर्यटकांचं आकर्षण असलेला हा पुल दोन वर्षाच्या बंदीनंतर उघडल्यानं नागरिकांची गर्दी होत आहे. रविवारी सुट्टी असल्यानं पुलावर मोठी गर्दी झाली होती.

झुलत्या पुलाची क्षमता १०० लोकांची असून, मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटना घडली तेव्हा तब्बल ४०० पेक्षा अधिक नागरिक पुलावर होते. क्षमतेपेक्षा अधिक लोक पुलावर गेल्यानंतर केबल ब्रिज कोसळला आणि लोक नदीत पडले. दुर्घटनेनंतर मदत व बचाव कार्य हाती घेण्यात आलं असून, अजूनही शोध कार्य सुरूच आहे. आतापर्यंत १७७ लोकांना बाहेर काढण्यात आलं असून, १४१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

gujarat morbi bridge accident : भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू

मोरबी येथे झालेल्या केबल ब्रिज दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. भाजप खासदार मोहन भाई कुंदरिया यांचे नातेवाईकही पूल कोसळला तेव्हा तिथे होते.

दुर्घटनेनंतर बोलताना खासदार मोहन भाई कुंदरिया म्हणाले, 'या घटनेत माझ्या भाऊजींच्या भावाच्या ४ मुली, ३ जावई आणि ५ मुलं यांचा मृत्यू झालाय. हे खूप वेदनादायी आहे.'

मोहनभाई कुंदरिया हे राजकोटचे खासदार आहे. 'मी सायंकाळपासून इथे आहे. १०० पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह मिळाले आहेत.' पूल खुला करण्याची परवानगी न घेतल्याच्या मुद्द्यावर खासदार कुंदरिया म्हणाले, 'ज्याची चूक असेल, त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. कुणालाही सोडणार नाही.'

दुरुस्तीनंतर ५व्या दिवशीच खुला करण्यात आला होता पूल

मिळालेल्या माहितीनुसार हा झुलता पूल दोन वर्षांपासून बंद होता. त्यानंतर त्याची डागडुजी आणि दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्ती करण्यात आल्यानंतर हा पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. पूल खुला करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाकडून फिटनेस सर्टिफिकेट घेण्यात आलेलं नव्हतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in