ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण, परिसरातल्या विहिरीत शिवलिंग आढळल्याचा दावा
वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पार पडलं आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस हे सर्वेक्षण सुरू होतं. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण पार पडलं. आता यात महत्त्वाची बाब समोर येते आहे ती म्हणजे या मशिद परिसरात जी विहीर आहे त्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हा […]
ADVERTISEMENT

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पार पडलं आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस हे सर्वेक्षण सुरू होतं. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण पार पडलं. आता यात महत्त्वाची बाब समोर येते आहे ती म्हणजे या मशिद परिसरात जी विहीर आहे त्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हा दावा केला आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल कोर्टात जाणार आणि त्यानंतर कोर्ट काय तो निर्णय घेणार आहे. मात्र त्याआधीच ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणत्या दिशेने जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं सगळं असलं तरीही जिथे शिवलिंग मिळाल्याचा दावा केला जातो आहे तो फोटो १९९० चा अहे असं सांगितलं जातं आहे.
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशिदीचा नेमका वाद कधी सुरू झाला?
या संदर्भात Aaj Tak सोबत फोनवर बोलताना वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की मशिदीच्या प्रांगणात ३० बाय ३० फुटाचा कृत्रीम तलाव सील करण्यात आला आहे. तो एक भाग वगळलं तर बाकीचं प्रांगण आणि मशिदीची जागा खुली आहे.