भयंकर घटना! खोदकाम करताना कोसळली दरड; पोकलेनसह 10 वाहनं ढिगाऱ्याखाली, एकाचा मृत्यू
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच हरयाणामध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. हरयाणातील भिवानी जिल्ह्यात खोदकाम करताना दरड कोसळून 8 ते 10 वाहनं ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. त्याचबरोबर 15 ते 20 नागरिकही ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू केलं आहे. तिघांना सुखरुप बाहेर काढलं असून, एकाचा मृतदेह मिळाला आहे. स्थानिक […]
ADVERTISEMENT

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच हरयाणामध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. हरयाणातील भिवानी जिल्ह्यात खोदकाम करताना दरड कोसळून 8 ते 10 वाहनं ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. त्याचबरोबर 15 ते 20 नागरिकही ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू केलं आहे. तिघांना सुखरुप बाहेर काढलं असून, एकाचा मृतदेह मिळाला आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे डाडम उत्सखनन क्षेत्रात डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळला. त्यामुळे त्या ठिकाणी असलेली 8 ते 10 वाहनं दरडीखाली दबली गेली. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि जिल्हा प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली. मदत व बचाव कार्य वेगाने केलं जात असून, आतापर्यंत तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नागरिकांना आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना घटनास्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. माहिती मिळाल्यानंतर हरयाणाचे कृषी मंत्री जेपी दलाल आणि पोलीस अधीक्षक अजित सिंह शेखावत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.