कोरोनाची धडकी! हरयाणातील पाच जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहांना पुन्हा टाळे

कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने हरयाणा सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-महाविद्यालये, जिम आणि चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे...
कोरोनाची धडकी! हरयाणातील पाच जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहांना पुन्हा टाळे
प्रातिनिधीक छायाचित्रAajtak

देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग वाढला असून, मुंबई, दिल्लीसह काही शहरं पुन्हा एकदा कोरोनाची हॉटस्पॉट बनताना दिसत आहे. संसर्गाचा वेग वाढल्याने हरयाणा सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाच जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, जीम, चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित चालवली जाणार आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हरयाणा सरकारने गुरुग्राम, फरिदाबाद, अंबाला, पंचकुला आणि सोनीपत या जिल्ह्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. गुरुग्राम, फरिदाबादमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यातील बाजारही सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र
...त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं भाष्य

बार आणि रेस्तराँ फक्त 50 टक्के क्षमतेनंच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकंच नाही, तर जे खेळाडू आणि प्रशिक्षाणार्थींसाठीच स्विमिंग पूल खुले असणार आहेत. तसेच एंटरटेनमेंट पार्कमध्येही लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

निर्बंध कडक करत असतानाच हरयाणा सरकारने लसीकरणावरही भर देण्यास सुरू केलं आहे. दोन डोज घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याबद्दलचा निर्णय घेण्यात आला असून, लग्न आणि अंत्यसंस्कारांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
Covid 19 : महाराष्ट्र वेगाने तिसऱ्या लाटेकडे! दिवसभरात 9170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

मुंबई-दिल्लीतील स्थिती चिंता वाढवणारी

हरयाणाबरोबरच राजधानी दिल्लीतील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होऊ लागली आहे. 24 तासांत दिल्लीत 2,716 रुग्ण आढळून आले आहेत. तर संसर्गाचा वेग 3.6 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईत रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचं दिसत आहे. मुंबईत शनिवारी 6,347 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत मुंबईत 157 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in