आरोग्य विभागाच्या परीक्षांची तारीख जाहीर 24 आणि 31 ऑक्टोबरला होणार परीक्षा
ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षांवरून घोळ झाला होता ऐनवेळी त्या परीक्षांची तारीख आता जाहीर झाली आहे. क विभागाची परीक्षा 24 तारखेला आणि ड विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. न्यासा या संस्थेने या परीक्षेची तारीख जाहीर केली होती. परीक्षा पुढे ढकलण्याचं काय सांगितलं गेलं कारण? राज्याच्या […]
ADVERTISEMENT

ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षांवरून घोळ झाला होता ऐनवेळी त्या परीक्षांची तारीख आता जाहीर झाली आहे. क विभागाची परीक्षा 24 तारखेला आणि ड विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. न्यासा या संस्थेने या परीक्षेची तारीख जाहीर केली होती.
परीक्षा पुढे ढकलण्याचं काय सांगितलं गेलं कारण?
राज्याच्या आरोग्य विभागाने सरळ सेवा भरती प्रक्रियेची जबाबदारी न्यासा या संस्थेवर सोपवलेली आहे. या संस्थेमार्फत गट क आणि गट ड प्रवर्गातील विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. २५ व २६ सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार होती.
दरम्यान, एक दिवस आधीच परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. यामुळे परीक्षार्थींची प्रचंड हेळसांड झाली होती. न्यासा संस्थेनं परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने परीक्षा स्थगित करत असल्याचं सरकारनं म्हटलं होतं. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र आता राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन या परीक्षा 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबरला होणार असल्याचं म्हटलं आहे.