“लाज वाटायला पाहिजे, बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली” : तानाजी सावंत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कधीकाळी मातोश्री म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जायचे. मात्र आता शिंदे गटात गेल्यापासून तानाजी सावंत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. नुकतंच उस्मानाबाद येथे झालेल्या मेळाव्यात सावंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “आम्हाला गद्दार म्हणता, पण ज्या बापानी तुम्हाला जन्माला घातलं त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे”, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शरद पवारांच्या मांडीवर बसून बाळासाहेबांचे विचार सोडून देण्याचं काम तुम्ही केलं, असं सावंत म्हणाले.

बाळासाहेबांचा फोटो लावू नका म्हणण्याचा तुम्हाला अधिकार काय?

पन्नास खोके, गद्दार, मुर्दाबाद, अमुक तमुक आम्हाला म्हणतात. आमचं तर सोडा पण ज्या बापाने जन्म दिला त्या बापाचे विचार तुम्ही सोडून दिले, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, असं सावंत म्हणाले. तुम्ही म्हणता माझ्या बापाचे फोटो लावायचे नाही, मग आमचा शिवबा तुम्हाला चालतो. महात्मा गांधी, बाळासाहेब, आनंद दिघे, शिवाजी महाराज, अंबाबाई यांचे फोटो लावा किंवा लावू नका असं म्हणण्याचं तुम्हाला काय अधिकार, असा प्रश्न त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना विचारला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खोक्याबद्दल बोलायला लावू नका, उद्धव ठाकरेंना इशारा

पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले, आज कळालं इतकी वर्ष घर प्रपंच सोडून ज्यांच्या मागे होतोत त्यांची बौद्धिक क्षमता काय आहे. त्यांना फक्त लेना बँक माहितीय देना नाही. आणि 50 खोकेचा अर्थ काय हे फक्त मला आणि माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माहितीय. म्हणून सांगतो फक्त आम्हाला बोलू देऊ नका, आमच्या तोंडातून वदवून घेऊ नका, तत्कालीन पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला विनंती करतो, असा इशाराच तानाजी सावंतांनी उद्धव ठाकरेंना देऊन टाकला.

ADVERTISEMENT

बाळासाहेबांचा विचार तुम्ही शरद पवारांच्या मांडीवर बसून सोडून दिलाय

ADVERTISEMENT

स्वतःच्या स्वार्थासाठी जीवाला जीव देणारा शिवसैनिक तुम्ही गमावला. गेली काही वर्ष बाळासाहेबांचा विचार तुम्ही शरद पवारांच्या मांडीवर बसून सोडून दिलाय, अशा शब्दात तानाजी सावंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार एकसंघ ठेवण्याचं काम माझे नेते एकनाथ शिंदे करत आहेत. एकदिवस उद्धव ठाकरेंना वाटेल की मी चुकलो. माफी मागण्याचा सुद्धा फार मोठं धैर्य लागतं. आई तुळजाभवानीने या नवरात्रीत तुम्हाला सद्बुद्धी देवो, असं तानाजी सावंत म्हणाले. यापूर्वी देखील तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. तर आदित्य ठाकरेंवर देखील निशाणा साधला होता. आता यावर उद्धव ठाकरे गटाकडून काय प्रतित्युर येतो, याकडे लक्ष असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT