नवरा-बायको आणि बहिणीच्या वादात दोन जणांचा मृत्यू

एकाच घरात हत्या आणि आत्महत्येचा प्रकार घडल्यामुळे शिरुर हादरलं
नवरा-बायको आणि बहिणीच्या वादात दोन जणांचा मृत्यू
या प्रकाराची माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी झाली होती

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात मांडवगण फराटा येथे आज एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबात आत्महत्या आणि हत्येची घटना घडल्यामुळे २ जणांचा मृत्यू तर एक जण अत्यवस्थ आहे. नवरा,बायको व बहीण असं तिहेरी वादातून ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मांडवगण येथील समिर तावरे यांचे त्यांची पत्नी वैशाली तावरे आणि बहीण माया सातव यांच्यात काल रात्री वाद झाल्याने बहीण माया सातव यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान बहिणीने विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती भाऊ समीर तावरे याला कळताच समीर आणि त्याची पत्नी वैशाली तावरे यांच्यात आज सकाळी वाद झाल्यानंतर या वादातून पती समीर याने पत्नी वैशाली वर कुर्‍हाडीने वार करत पत्नीला ठार केले.

या प्रकाराची माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी झाली होती
पंढरपूर : पत्नी आणि मुलीचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला अटक

पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून ती मृत्यू झाली आहे हे समजल्यावर स्वतः समीर तावरे यानेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून समीरची प्रकृती सध्या गंभीर आणि चिंताजनक असून आहे.समीर वर सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत तर वैशाली तावरे आणि माया सातव यांचा यात मृत्यू झाला आहे.

कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना असे टोकाचे पाऊल उचलले आहे याबाबत सध्या मांडवगण फराटा पोलीस चौकी व शिरुर पोलिस स्टेशन चे पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

या प्रकाराची माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी झाली होती
कोल्हापूर : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला ५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in