विल्सन यांचा कॉम्प्युटर हॅक करुन त्यात पेपर प्लाण्ट केले
मुंबई तक: साधारण 22 महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी अक्टिव्हिस्ट रोना व्हिल्सन यांच्या दिल्ली येथील घरावर छापा मारुन त्यांना अटक केली होती. सायबर हल्लेखोरांनी रिमोट पद्धतीने त्यांच्या कम्प्यूटरचा अक्सेस मिळवून त्यामध्ये ‘अर्बन नक्सल’ प्रकरणात गोवणारी ती पत्र त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये प्लाण्ट केली. 2018 मध्ये माध्यमांमध्ये हेडलाईन बनलेल्या ‘अर्बन नक्सल केस’ मध्ये विल्सन यांचा हा कॉम्प्युटर हा अत्यंत महत्त्वाचा […]
ADVERTISEMENT

मुंबई तक: साधारण 22 महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी अक्टिव्हिस्ट रोना व्हिल्सन यांच्या दिल्ली येथील घरावर छापा मारुन त्यांना अटक केली होती. सायबर हल्लेखोरांनी रिमोट पद्धतीने त्यांच्या कम्प्यूटरचा अक्सेस मिळवून त्यामध्ये ‘अर्बन नक्सल’ प्रकरणात गोवणारी ती पत्र त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये प्लाण्ट केली. 2018 मध्ये माध्यमांमध्ये हेडलाईन बनलेल्या ‘अर्बन नक्सल केस’ मध्ये विल्सन यांचा हा कॉम्प्युटर हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. अर्बन नक्सल केस मध्ये तुरुंगात असलेले कवी वरवरा राव, अडव्होकेट सुधा भारद्वाज, अरुन फेरेरा आणि इतरांप्रमाणेच रोना विल्सन हे गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत.
विल्सन यांनी पुणे पोलिसांनी त्यांच्या घरातून जप्त केलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्यासाठी अमेरिका स्थित आर्सेनल कंपनीची 17 एप्रिल 2018 पासून मदत घेतली. ही खासगी कंपनी डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रात सरकारी कंपन्या आणि लॉ फर्म्सना मदत करते.
याच आर्सेनल कंपनीला 31 जुलै 2020 मध्ये एक हार्ड ड्राईव्ह मिळालं ज्याची कॉम्प्युटरला जोडलेल्या थंब ड्राईव्हबरोबर तपासणी केली. त्यानंतर आर्सेनल या कंपनीने तयार केलेल्या रिपोर्टच्या 16 व्या पानावर कंपनीने एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, ज्यानुसार सायबर हल्लेखोराने विल्सन यांच्या कॉम्प्युटरमध्ये शिरकाव करुन कॉम्प्युटरवर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि चुकीचे डॉक्युमेंट्स त्यात प्लाण्ट केल. हल्लेखोराचा हाच उद्देश होता.
सायबर हल्लेखोराने तब्बल 22 महिने विल्सन यांचा कॉम्प्युटर फक्त हॅक केला. त्यासाठी हल्लेखोराने वापरलेलं मालवेयर जसं विल्सन यांचा कॉम्प्युटर हॅक करायला तर वापरलं तसंच त्यांच्याबरोबर भीमा कोरेगाव केसमध्ये त्यांचे सह आरोपी यांचे कॉम्प्युटरवर हॅक करायला आणि भारतातील इतर हाय प्रोफाईल केसमध्येही वापरण्यात आलय.