इंदापूर: टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
इंदापूर: गावातील टवाळ मुलांच्या छेडछाडीला कंटाळून एका नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील बोरी या गावात बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. सिद्धी गजानन भिटे असे या अल्पवयीन मुलीचे नाव असून ती बोरी गावातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. शाळेत जात असताना गावातील 3 टवाळखोर […]
ADVERTISEMENT

इंदापूर: गावातील टवाळ मुलांच्या छेडछाडीला कंटाळून एका नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील बोरी या गावात बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
सिद्धी गजानन भिटे असे या अल्पवयीन मुलीचे नाव असून ती बोरी गावातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. शाळेत जात असताना गावातील 3 टवाळखोर मुले तिची सतत छेड काढत होते. त्यांच्या याच छेडछाडीला कंटाळून सिद्धीने आत्महत्या केल्याचं यावेळी समोर आलं आहे.
टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून सिद्धीने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाइड नोटही लिहली होती. ज्यामध्ये असं लिहलं आहे की, ‘मला माहित आहे माझं चुकतंय, पण आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.
याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सिद्धीचे वडील गजानन भिटे यांनी भवानीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश संतोष कुचेकर, यश अरुण गरगडे आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.