महाराष्ट्रातले विशिष्ट उद्योगपती आणि मध्यस्थ आयकर विभागाच्या रडारवर, ‘हे’ आहे कारण
आयक विभागाने महाराष्ट्रातील विशिष्ट उद्योगपती आणि मध्यस्थ तसंच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या एका मोठ्या वर्तुळावर छापे घातले ज्याची सुरुवात 23 सप्टेंबरपासून झाली होती. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून याबाबतची माहिती गुप्तचरांकडून घेतली जात होती. या छाप्यांदरम्यान एकूण 25 निवासी आणि 15 कार्यालयांवर छापे घालण्यात आले तर 4 कार्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. अजित पवार म्हणाले, रक्ताचं […]
ADVERTISEMENT

आयक विभागाने महाराष्ट्रातील विशिष्ट उद्योगपती आणि मध्यस्थ तसंच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या एका मोठ्या वर्तुळावर छापे घातले ज्याची सुरुवात 23 सप्टेंबरपासून झाली होती. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून याबाबतची माहिती गुप्तचरांकडून घेतली जात होती. या छाप्यांदरम्यान एकूण 25 निवासी आणि 15 कार्यालयांवर छापे घालण्यात आले तर 4 कार्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले.
अजित पवार म्हणाले, रक्ताचं नातं म्हणून बहिणींवर IT कारवाई याचं…
मुंबईमधील ओबेरॉय हॉटेलमधील काही सूट्स या मध्यस्थांपैकी दोघांनी कायमस्वरुपी भाड्याने घेतले होते आणि त्यांच्या ग्राहकांची भेट घेण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. या सूट्सची देखील तपासणी करण्यात आली. मध्यस्थ आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या या वर्तुळाकडून आपल्या दस्तावेजांमध्ये विविध गोपनीय सांकेतिक खुणांचा वापर केला जात होता आणि काही दस्तावेज तर 10 वर्षांपूर्वीचे होते. या शोधमोहिमेत एकूण 1050 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले. हे मध्यस्थ कॉर्पोरेट आणि उद्योगपतींना भूमी हस्तांतरित करून देण्यापासून ते सर्व प्रकारच्या सरकारी मंजुरी मिळवून देण्यापर्यंत एन्ड टू एन्ड सेवा उपलब्ध करून देत होते.
अजित पवारांचे ‘ते’ सात निकटवर्तीय ज्यांच्यावर झाली आयकर विभागाची कारवाई